मामी-भाच्याने केला खतरनाक कांड! शारीरिक संबंध करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले अन् घडलं भयंकर, पोलिसही हादरले!

Aunt And Nephew Love Affair News : उत्तरप्रदेशच्या बुलंदशहरमध्ये एक खळबळजन घटना घडली आहे. येथे एका भाच्याचं चक्क त्याच्या मामीसोबत प्रेम जडलं.

Shocking Love Story Viral

Shocking Love Story Viral

मुंबई तक

• 08:51 PM • 22 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मामी-भाच्याच्या प्रेमकहाणीमुळं सर्वांनाच बसला धक्का

point

त्या हॉटेलमध्ये नेमकं घडलं तरी काय?

point

पोलिसांनी दोघांनाही घेतलं ताब्यात

Aunt And Nephew Love Affair News : उत्तरप्रदेशच्या बुलंदशहरमध्ये एक खळबळजन घटना घडली आहे. येथे एका भाच्याचं चक्क त्याच्या मामीसोबत प्रेम जडलं. त्यानंतर हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली. एक दिवस दोघेही शारीरिक संबंध करण्यासाठी हॉटेलमध्ये पोहोचले. पण काही वेळानंतरच दोघांच्या स्वप्नांचा चक्काकूर झाला. त्यानंतर दोघांनी असं पाऊल उचललं, जे पाहून पोलिसांनाही हादरा बसला. भांडाफोड होईल म्हणून दोघेही त्याच हॉटेलमध्ये विष प्यायले. त्या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यावर त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

हे वाचलं का?

त्या हॉटेलमध्ये नेमकं घडलं तरी काय?

प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. प्रेम व्यक्त करायचं असतं. पण कधीकधी काही लव्ह स्टोरीज नात्यांना काळीमा फासण्याचं काम करतात. गौतमबुद्ध नगर येथे राहणाऱ्या एका महिलेचं लग्न जहांगीराबादमध्ये झालं होतं. तर भाचा दिल्लीत राहत होता. दोघांमध्ये इतकं प्रेम वाढलं की, पतीला धोका देऊन मामी भाच्यासोबत पळून गेली. दोन दिवसांपूर्वीच दोघेही घर सोडून हॉटेलला आले होते. 

हे ही वाचा >> सोबत फिरायला गेले आणि गाडीतच मित्राचा जीव घेतला... मुळशीतील हादरवून टाकणारी घटना काय?

दिल्लीच्या प्रेमनगर करावल नगरमध्ये राहणाऱ्या भाचाचं मामीसोबत प्रेमप्रकरण सुरु झालं. तिची मामी गौतमबुद्धनगरच्या निक्सन विला बीटा-2 ग्रेटर नोएडा येथे राहते. तिचं लग्न जहांगीराबाद येथे राहणाऱ्या तरुणासोबत झालं. ती महिला काही दिवसांपासून माहेर राहत होती. 17 जूनला ती भाच्यासोबत पळून गेली. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. 

गौतमबुद्धनगर आणि दिल्ली पोलिसांकडून दोघांचाही शोध घेतला जात होता. दिल्ली पोलिसांना शनिवारी खबर मिळाली की, मामी आणि भाचा बुलंदशहरच्या जुन्या रोडवेज बस स्टँडच्या समीप हॉटेलमध्ये थांबले होते. दिल्ली पोलिसांनी पुन्हा नगर पोलिसांना संपर्क केला. पोलीस येण्याची खबर मिळताच महिलेनं प्रियकरासोबत विष पिलं. त्यांना रुग्णालयात दाखल केलं आणि नंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

हे ही वाचा >> दुकानाजवळ लघवी केली म्हणून वाद, मटन कापण्याच्या सुऱ्याने भोसकून हत्या, संभाजीनगरमधील घटना काय?

    follow whatsapp