पुतण्या काकीसोबत रोज शारीरिक संबंध करायचा..एक दिवस घडलं भयंकर! प्रकरण थेट पोलीस स्टेशनमध्ये

मुंबई तक

• 04:08 PM • 25 Jun 2025

Aunt And Nephew Affair Viral News : मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये काकी आणि पुतण्याचं प्रेमप्रकरण समोर आलं आहे. काकीने तिच्या पतीला सोडून पुतण्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.

Aunt And Nephew Love Affair

Aunt And Nephew Love Affair

Google CTA

बातम्या हायलाइट

point

काकी-पुतण्याच्या प्रेमप्रकरणामुळे उडाली खळबल

point

पुतण्याने काकीला धोका का दिला?

point

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

Aunt And Nephew Affair Viral News : मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये काकी आणि पुतण्याचं प्रेमप्रकरण समोर आलं आहे. काकीने तिच्या पतीला सोडून पुतण्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही दोन वर्ष एकत्रित राहले. पुतण्याने वचन दिलं होतं की, तो काकीसोबत लग्न करेल. पण दोन वर्ष लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहून त्याने लग्न केलं नाही. त्यानंतर काकीला फसवून तो घरातूनही पळून गेला. काकीने आता पुतण्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

पुतण्याने काकीला धोका का दिला? पोलिसांनी गुन्हा दाखल केला अन्..

शहरात हजीरा पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या 30 वर्षीय मिहिलेनं पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. तिने तक्रारीत म्हटलंय, सहा वर्षांपूर्वी तिंच लग्न गदाईपुरा येथे राहणाऱ्या तरुणासोबत झाली होती. लग्नानंतर ती पतीसोबत भाड्याने राहत होती. तिला दोन मुलंही आहेत. महिला ज्या भाड्याच्या घरात राहत होती, त्याच बाजूला असलेल्या एका रुममध्ये तिचा पुतण्या राहायचा. नातेसंबंध असल्याने दोघांचही एकमेकांच्या घरी येणं जाणं व्हायचं. याच दरम्यान काकीचं पुतण्यासोबत प्रेमप्रकरण सुरु झालं.

हे ही वाचा >> 'बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा', पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून पुण्यात पोस्टरबाजी

पीडित महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, जवळपास दोन वर्षांपूर्वी भाच्याच्या प्रेमात पडल्याने तिने पती आणि मुलांना सोडलं आणि पुतण्यासोबत लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहायला लागली. याचदरम्यान पुतण्याने काकीला लग्नाचं वचन दिलं आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध केले. पण आता त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. काकीला धमकी देऊन तो घरातून फरार झाला आहे.

 पीडितेनं पोलिसांना सांगितलं की, तो (पुतण्या) माझ्यासोबत रोज संबंध करायचा. लग्नाचं वचन दिलं होतं. पण नंतर त्याने निर्णय बदलला आणि घरातून पळून गेला. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

हे ही वाचा >> प्रेयसीचं दुसरीकडेच ठरलं लग्न म्हणून शेवटच्या भेटीसाठी हॉटेलमध्ये बोलवलं अन् झाला मोठा कांड!