Beed Crime : शिवराज शिवटेला मारहाण, सुरेश धस कडाडत म्हणाले 'त्या मुलांना तर...'

Beed Crime : बीडमधील शिवराज दिवटे प्रकरणात अल्पवयीन मुलांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सुरेश धस यांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे प्रतिक्रिया दिली आहे.

Beed Crime News Shivraj divate case on bjp suresh dhas aggressive

Beed Crime News Shivraj divate case on bjp suresh dhas aggressive

मुंबई तक

19 May 2025 (अपडेटेड: 19 May 2025, 06:07 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख हत्येनंतर बीडच्या गुन्हेगारीत वाढ होताना दिसते.

point

शिवराज दिवटे मारहाणप्रकरणाचे अनेक फोटो आणि व्हिडिओज् सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत.

point

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बीडमधील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं.

Beed Crime : संतोष देशमुख हत्येनंतर बीडमध्ये गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील आकांच्या आकांचे मारहाणीचे काही व्हिडिओज् समोर येत आहेत. अशातच परळी तालुक्यात वाल्मिक कराडचा निकटवर्तीय असणाऱ्या गोट्या गित्ते आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी शिवराजला मारहाण केली. त्याचा व्हिडिओ समोर येत आहे. संबंधित व्हिडिओत रिंगण घालून पीडित शिवराज दिवटेला मारहाण केली. ही घटना अखंड हरिणाम सप्ताहच्या दिवशीच घडली. या घटनेवर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बीडमधील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. 

हे वाचलं का?

बीडमधील वाढती गुन्हेगारी आणि व्हायरल झालेल्या मारहाणीच्या व्हिडिओमुळे बीडचे वातावरण चांगलं तापलं आहे. यचपार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना, अल्पवयीन मुलांचा या प्रकरणात समावेश असल्याचं सांगितलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी संबंधित व्हिडिओत भाषेचा खालचा स्तर वापरला आहे. अल्पवयीन मुलांवरही कारवाई करण्याची एसपींकडे मागणी सुरेश धस यांनी केली आहे. 

काय म्हणाले सुरेश धस? 

ते म्हणाले की, ज्याप्रकारे पुणे पोर्शेप्रकरणातील अल्पवयीन मुलाला शिक्षा देण्यात आली. त्याप्रमाणे अल्पवयीन मुलांना सुज्ञानाप्रमाणेच शिक्षा द्यावी. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. काही आरोपी हे पोलिसांच्या अटकेत आहेत. मात्र, काहीजण पोलिसांच्या ताब्यात आले नाहीत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावं आणि त्यांना अटक करावी. त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करावा, असे म्हणत सुरेश धस यांनी संताप व्यक्त केला आहे. 

दरम्यान, 19 मे दिवशी या मारहाणीच्या प्रकरणानंतर बीडकरांनी बीड जिल्हा बंदची हाक दिली होती. यासंबंधित पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. मात्र, बीड जिल्हा बंदची हाक स्थगित करण्याचा निर्णय बीडकरांनी घेतला. दरम्यान, आंदोलन सुरुच राहणार असल्याचं बोललं जातंय. 

नेमकं काय होतं प्रकरण? 

बीडमधील परळीतील लिंबोटा या गावातील रहिवासी असणाऱ्या शिवराज दिवटे या तरुणाला एका डोंगरावर नेत रिंगण करत मारहाण केली. अशावेळी त्याला रॉड, बेल्टने मारहाण करण्यात आली. मारहाणीदरम्यान त्याला शिवीगाळही करण्यात आली. यात वाल्मिक कराडचा निकटवर्ती असणाऱ्या गोट्या गित्तेच्या साथीदारांचा मारहाण प्रकरणात समावेश आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर कळलं की, शिवराज हा जीवाच्या आकांतानं ओरडत आहे. 'मला सोडा भाऊ...'पण अशावेळी त्याला अधिकच मारहाण करण्यात आली. याचाच दुसराही व्हिडिओ आता समोर आला आहे. 

दुसऱ्या व्हिडिओत शिवराज हा केस वाढलेल्या मुलाच्या हातापाया पडत आहे. 'मला जाऊद्या, मला सोडा, असं म्हणत शिवराज हा हात जोडून पाया पडत विनंती करत आहे.

'तुझा संतोष देशमुख पार्ट 2 करु', असं म्हणत शिवराजला धमक्या देण्यात आल्या. अशातच आता काही आरोपींना परळीतील संभाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर काही आरोपींना पोलिसांनी लवकरच ताब्यात घ्यावं असं सुरेश धस यांनी सांगितलं आहे. 


 

    follow whatsapp