Beed Crime News : बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील जलालपूरमध्ये सप्ताहाच्या कार्यक्रमादरम्यान वादानंतर शिवराज दिवटे या तरूणाला संतोष देशमुख यांच्यासारखीच मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. मात्र, या प्रकरणात आता एक आणखी ट्वीस्ट आला आहे. या घटनेतील आरोपी समाधान मुंडे यालाही मारहाण होतानाच एक व्हिडीओ समोर आलाय.
ADVERTISEMENT
व्हिडीओमध्ये काय?
रहदारी असलेल्या परळीतील एका रस्त्यावर काहीजण एका तरूणाला बेदम मारहाण करत आहेत. मारहाण करताना काहींनी त्याचे केस धरून त्याला पकडून ठेवलंय. या तरूणाला काठ्यांनी, हाताने, लाथांनी मारहाण होतेय. हा तरूण मारहाण शिवराज दिवटेला मारहाण प्रकरणातील आरोपी समाधान मुंडे असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओवर 16 मे ची तारीखही वरून लिहिलेली दिसतेय. ही तीच तारीख आहे, ज्या दिवशी समाधान मुंडे या टोळक्यानं शिवराजला मारहाण केली होती. मात्र, आता समोर आलेला व्हिडीओ हा नेमका 16 मेचा आहे की दुसऱ्या दिवशीचा हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.
हे ही वाचा >> Beed : रॉड, कत्ती, बेल्ट, काठीने शिवराजला मारणारे 7 जण कोण? सगळ्या आरोपींची नावं, खळबळजनक माहिती समोर
काळ्या टी-शर्टमधील समाधान मुंडे याला जलालपूर परिसरात जमावाने मारहाण केली. ही घटना सप्ताहाच्या कार्यक्रमात घडली असून, यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पावलं उचलली आहेत.
शिवराज पाटीलला मारहाणीचं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवराज नारायण दिवटे हा आपला मित्र जयदिप मुंडे याच्यासह मोटारसायकलवरुन लिंबोटी गावाकडे जात होता. त्यावेळी रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ तीन ते चार मोटारसायकलस्वारांनी त्यांची गाडी अडवली. यानंतर आरोपींनी शिवराजला हाताने मारहाण करुन जबरदस्तीने रत्नेश्वर डोंगरातील झाडीमध्ये नेलं. तिथं सुमारे 20 जणांनी शिवराजला लोखंडी रॉड, कत्ती, बेल्ट, काचेची बाटली आणि लाकडी काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केलं. "हा त्या भांडणात होता, याला मारुन टाका," असं म्हणत आरोपींनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शिवराज यांनी जोरजोरात ओरडत मदतीसाठी याचना केल्या. तेव्हा काहीजण धावून आले. पण तोपर्यंत शिवराज बेशुद्ध झाला होता. या मारहाणीचा व्हिडीओ मारहाण करणाऱ्याच काहींनी मोबाईलवर रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर व्हायरल केला.
अटक आरोपींची नावं
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सचिन विष्णु मुंडे (24, नंदागौळ), समाधान श्रीकृष्ण मुंडे (20, टोकवाडी), रोहन उमेश वाघुळकर (18 वर्ष 11 महिने, विद्यानगर), अदित्य बाबासाहेब गित्ते (18 वर्ष 10 महिने, नंदागौळ), तुकाराम ऊर्फ ऋषीकेश ज्ञानोबा गिरी (18 वर्ष 3 महिने, टोकवाडी) यांचा समावेश आहे. याशिवाय दोन अल्पवयीन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
हे ही वाचा >> सिगारेट आणलं नाही..भर रस्त्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरला चिरडलं! थरारक Video होतोय व्हायरल
दरम्यान, जखमी शिवराज याच्यावर आधी परळीतील सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. नंतर पुढच्या उपचारासाठी त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. 17 मे रोजी शिवराज याच्या तक्रारीवरुन परळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 105/२०२५ अंतर्गत कलम 109, 126(2), 140(3), 118(1), 189(2), 189(4), 190, 191(3) BNS अन्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय.
ADVERTISEMENT


 होम
होम राजकीय आखाडा
राजकीय आखाडा गुन्ह्यांची दुनिया
गुन्ह्यांची दुनिया शहर-खबरबात
शहर-खबरबात राशीभविष्य-धर्म
राशीभविष्य-धर्म पैशाची बात
पैशाची बात फोटो बाल्कनी
फोटो बाल्कनी हवामानाचा अंदाज
हवामानाचा अंदाज टॉपिक
टॉपिक











