Crime News : बायकोच्या इन्स्टाग्रामवरील प्रेमप्रकरणाला कंटाळल्याने एका व्यक्तीने बायकोची गोळी घालून हत्या केली आहे. आश्चर्य म्हणजे पोलिसांना संशय येऊ नये यासाठी बायकोची हत्या करुन मृतदेहाशेजारी आणि पोलिस तपासादरम्यान तो खूप रडला. मात्र पोलिसांनी कसून चौकशी करताच धक्कादायक कारण समोर आले. बिहारच्या बेगुसराय परिसरातील ही घटना असून चंदन कुमार चौधरी असं या आरोपीचं नाव आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : आईच्या प्रियकराला भर रस्त्यात भोसकलं; छातीवर पाय ठेऊन पोलिसांना फोन, तरुणानं कशाचा बदला घेतला?
गोळ्या घालून केलं ठार
1 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चंदन कुमार चौधरी हा त्याची पत्नी सुमन कुमारी आणि मुलीसह मेहुणीच्या घरी पूजेसाठी चालला होता. यादरम्यान, चंदनने त्याच्या पत्नीला शेतात नेलं आणि गोळ्या घालून ठार केले. यानंतर त्याने रडत-रडत पोलिसांना फोन केला आणि त्यांचा शेजारी दीपक कुमार याने परस्पर वादातून गोळ्या घालून हत्या केल्याचं सांगितलं. मात्र पोलिस तपासात एक वेगळंच कारण समोर आलं.
पोलिस तपासात धक्कादायक कारण उघड
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान, सुमनच्या नातेवाईकांनी चंदन कुमारवर संशय असल्याचं सांगितलं. त्यामुळं पोलिसांनी चंदनची कसून चौकशी केली. या चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, 'त्याच्या पत्नीचे गुजरातमधील अखिलेश नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. इन्स्टाग्रामवरुन दोघांची ओळख झाली होती. ती वारंवार गुजरातला जात असे. तिला समजावूनही तिनं ऐकलं नाही. त्यामुळं मी तिची हत्या केली.'
हे ही वाचा : नववीच्या विद्यार्थीनीला वर्गातल्या 5 मुलांनी निर्जनस्थळी नेलं, सहावा बाहेरुन आला अन्... हादरवणारं प्रकरण
पूजेच्या दिवशी काय घडलं?
जेव्हा चंदन आपली पत्नी आणि मुलींसह मेहुणीच्या घरी जात होती, तेव्हा दोघांत वाद झाला. पूजा झाल्यानंतर ती गुजरातला जाणार असल्याचं चंदनला समजलं होतं. तिला चंदनने खूप समजावलं. पण तिनं ऐकलं नाही. शेवटी चंदनचा राग अनावर झाला आणि त्याने आपल्या बायकोला संपवलं. दरम्यान, गुन्ह्यात वापरण्यात पिस्तूल, चार काडतुसे आणि दोन पुंगळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT











