नवऱ्याचे तुकडे तुकडे करून मृतदेह निळ्या ड्रेममध्ये भरला, नंतर ब्लिचिंग पाउडर टाकली, तब्बल 4 वर्षानंतर..

मुंबई तक

• 01:56 PM • 04 Feb 2026

crime news : बायकोचे एका परपुरुषासोबत अनैतिक प्रेमसंबंध सुरु असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर बायकोनं प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीचा काटा काढला. पतीला ठार करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते प्रेत एका निळ्या ड्रममध्ये फेकून देण्यात आलं. या प्रकरणी न्यायालयाने आरोपी शुभाष शर्माला दोषी ठरवलं.

crime news

crime news

Google CTA

Crime News : बायकोचे एका परपुरुषासोबत अनैतिक प्रेमसंबंध सुरु असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर बायकोनं प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीचा काटा काढला. पतीला ठार करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते प्रेत एका निळ्या ड्रममध्ये फेकून देण्यात आलं. या प्रकरणी न्यायालयाने आरोपी शुभाष शर्माला दोषी ठरवलं. या प्रकरणी न्यायालयाने 13 फेब्रुवारी रोजी सुनावण्यात आली होती. ही घटना बिहारच्या मुजफ्फरनगरातील आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार, 'या' राशीतील लोकांना नोकरीत बढती मिळण्याची शक्यता, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

पत्नी राधाचे सुभाष शर्मा नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध

मुजफ्फरनगरातील बालूघाट परिसरातक सप्टेंबर 2021 रोजी मन हेलावून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. मृत राकेश कामासाठी दिल्लीत राहत होता. त्याची पत्नी राधा आपल्या तीन मुलांसह, बहीण आणि तिच्या पतीच्या घरी भाडेतत्त्वावर राहत होती. पती राकेश दिल्लीला कामासाठी गेल्याने राधाने एका सुभाष शर्मा नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध सुरु होते. 

बायकोनं प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं

राधा, सुभाष हे एकमेकांसोबत उर्वरित पुढील आयुष्य घालवण्याचा विचार करत होते. जेव्हा राकेश सहानी घरी आला तेव्हा दोघांनी मिळून राकेश सहानीची हत्या केली. नंतर राकेशचा मृतदेह हा एका निळ्या ड्रेममध्ये भरून ठेवला होता. नंतर त्यावरून ब्लिचिंग पाउडर आणि फिनाइल टाकण्यात आलं होतं. 18 सप्टेंबर 2021 रोजी रात्री रसायनांमधील अभिक्रियेमुळे ड्रममध्ये मोठा स्फोट झाला आणि खोली आग लागली. 

हे ही वाचा : फडणवीस म्हणाले, विलीनीकरणाची चर्चा झाली असती तर दादांनी मला सांगितलं नसतं का? आता शरद पवारांचं प्रत्युत्तर

परिस्थिती पाहता घटनास्थळी अग्निशमन दलाने धाव घेत खोलीतील ड्रेममधून मृतदेहांचे अवयव जप्त करण्यात आले. 19 सप्टेंबर 2021 रोजी, मृत व्यक्ती राकेशचा भाऊ, दिनेश साहनीने हत्येप्रकरणी आरोपीविरोधात एफआरआय दाखल केला होता.