आई प्रियकरासोबत कोल्हापूरला पळून गेल्याचा राग, 10 वर्षांनंतर गावात दिसताच मुलाने मम्मीच्या प्रियकराला संपवलं

Crime News : या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव बसप्पा होसमानी (वय 51) असे असून तो बसडोणी गावाचा रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी बसप्पा काही कामानिमित्त रस्त्याने जात असताना आधीपासूनच दबा धरून बसलेल्या एरय्या मठपती याने त्याला अडवले. त्यानंतर धारदार शस्त्राने बसप्पावर सपासप वार करण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तब्बल 16 वेळा वार केल्याने बसप्पाचा जागीच मृत्यू झाला.

Crime News Marathi

Crime News Marathi

मुंबई तक

04 Feb 2026 (अपडेटेड: 04 Feb 2026, 01:33 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आई पळून गेल्याचा राग

point

10 वर्षांनंतर गावात दिसताच मुलाने मम्मीच्या प्रियकराला संपवलं

point

मृतदेहावर पाय ठेवला अन्..

Crime News : कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील सावदत्ती तालुक्यात सोमवारी सायंकाळी घडलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. हुलिकट्टी गावाजवळील रस्त्यावर एका व्यक्तीची भररस्त्यात अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेहाजवळच उभे राहून पोलिसांची वाट पाहिली आणि पोलिस येईपर्यंत मृत व्यक्तीच्या छातीवर पाय ठेवून उभा राहिला. या घटनेचे संपूर्ण गाव हादरवून गेलंय.  

हे वाचलं का?

या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव बसप्पा होसमानी (वय 51) असे असून तो बसडोणी गावाचा रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी बसप्पा काही कामानिमित्त रस्त्याने जात असताना आधीपासूनच दबा धरून बसलेल्या एरय्या मठपती याने त्याला अडवले. त्यानंतर धारदार शस्त्राने बसप्पावर सपासप वार करण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तब्बल 16 वेळा वार केल्याने बसप्पाचा जागीच मृत्यू झाला.

ही धक्कादायक घटना सावदत्ती शहराजवळ घडली असून हा परिसर प्रसिद्ध येल्लम्मा देवीच्या मंदिरामुळे धार्मिक आणि संवेदनशील मानला जातो. भर दिवसा आणि सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. काही काळ नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. अनेकांनी भीतीपोटी घटनास्थळापासून दूर राहणे पसंत केले.

हेही वाचा : Govt Job: काय सांगता? टपाल विभागात तब्बल 28,000 हून अधिक पदांसाठी भरती! कोणतीही परीक्षा नाही अन्...

पोलिस तपासात या हत्येमागचे धक्कादायक कारण समोर आले आहे. आरोपी एरय्या मठपती आणि मृतक बसप्पा होसमानी यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वैर होते. सुमारे दहा वर्षांपूर्वी बसप्पा हा आरोपीच्या आईसोबत घर सोडून निघून गेला होता. त्यानंतर दोघे कोल्हापूरमध्ये राहत होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. या घटनेनंतर एरय्या मनात तीव्र राग आणि सूडाची भावना बाळगून होता. अलीकडेच बसप्पा पुन्हा आपल्या गावात आणि आसपासच्या परिसरात परतल्याची माहिती एरय्याला मिळाली. त्यानंतर त्याने सूड उगवण्याचा निर्णय घेतला आणि योग्य संधी साधून ही हत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून न जाता स्वतःच सावदत्ती पोलिसांना फोन करून आपण हत्या केल्याची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता आरोपी मृतदेहाजवळ उभा असून त्याचा एक पाय मृताच्या छातीवर ठेवलेला होता. पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या पोलिसांकडून आरोपीने ही हत्या एकट्याने केली की त्याला कुणाची मदत होती, याचा तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोस्टमॉर्टेम अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. या घटनेने सावदत्ती तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

फडणवीस म्हणाले, विलीनीकरणाची चर्चा झाली असती तर दादांनी मला सांगितलं नसतं का? आता शरद पवारांचं प्रत्युत्तर
 

    follow whatsapp