आईच्या प्रियकराला भर रस्त्यात भोसकलं; छातीवर पाय ठेऊन पोलिसांना फोन, तरुणानं कशाचा बदला घेतला?

मुंबई तक

• 01:08 PM • 04 Feb 2026

Crime News : आईला पळवून नेल्याच्या रागात एका तरुणाने आईच्या प्रियकराचा भर रस्त्यात खून केला आहे. जवळपास १६ वेळा चाकू भोसकून त्याने हा खून केला. इतकंच नाही तर, खून केल्यानंतर छातीवर पाय ठेऊन त्याने पोलिसांना फोन केला आणि खून केल्याचे सांगितले. इरैय्या मठपती असं या तरुणाचं नाव असून दहा वर्षांपासून तो सूडभावनेने पेटला होता. कर्नाटकातील बेळगावीमधील ही घटना आहे.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आईच्या प्रियकराला भर रस्त्यात भोसकलं

point

छातीवर पाय ठेऊन पोलिसांना फोन

Crime News : आईला पळवून नेल्याच्या रागात एका तरुणाने आईच्या प्रियकराचा भर रस्त्यात खून केला आहे. जवळपास 16 वेळा चाकू भोसकून त्याने हा खून केला. इतकंच नाही तर, खून केल्यानंतर छातीवर पाय ठेऊन त्याने पोलिसांना फोन केला आणि खून केल्याचे सांगितले. इरैय्या मठपती असं या तरुणाचं नाव असून दहा वर्षांपासून तो सूडभावनेने पेटला होता. कर्नाटकातील बेळगावीमधील ही घटना आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'कोरियन गेम'चा शेवटचा टास्क... प्राचीची कमांड अन् तीन बहिणींनी 9 व्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला!

आईला पळवून नेल्याचा राग

बसप्पा होसमानी असं 51 वर्षीय मृताचं नाव आहे. तो कर्नाटकातील बसाडोनी गावचा राहणारा होता. इरैय्याच्या आईसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. दहा वर्षांपूर्वी इरैय्याची आई आणि बसप्पा हे दोघं पळून गेले होते. पळून जाऊन दोघांनी कोल्हापूरात जाऊन नवं आयुष्य सुरु केलं होतं. ही गोष्ट इरैय्याला त्रास देत होती. याचा सूड उगवण्याची संधी तो शोधत होता. अखेर दहा वर्षानंतर त्याला ही संधी मिळाली आणि आईच्या प्रियकराला त्याने भर रस्त्यात संपवले.

दहा वर्षांनी सूडाग्नी शांत

बसप्पा काही कामासाठी सवदत्ती या तालुक्याच्या ठिकाणी आला होता. याची माहिती इरैय्याला मिळाली. याचा फायदा उठवण्याचं त्यानं ठरवलं. याठिकाणी यल्लम्मा मंदिराजवळून बसप्पा बाईकवरुन चालला होता. त्याला इरैय्याने गाडीवरुन खाली पाडलं आणि चाकूने तब्बल १६ वेळा भोसकलं. यात बसप्पाचा जागाची मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाल्यानंतर इरैय्यानं मृतदेहावर पाय ठेऊन पोलिसांना फोन केला. हे दृश्य बघून लोक हादरुन गेले.

हे ही वाचा : नववीच्या विद्यार्थीनीला वर्गातल्या 5 मुलांनी निर्जनस्थळी नेलं, सहावा बाहेरुन आला अन्... हादरवणारं प्रकरण

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

इरैय्याने फोन केल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. इरैय्याने खूनाची कबूली देताच पोलिसांनी त्याला अटक केली. सवदत्ती पोलिसांनी त्याच्यावर खूनाचा गुन्हा नोंदवला असून पुढीस तपास सुरु असल्याची माहिती आहे.