रुममध्ये मोठ्याने गाणी लावली अन् चुलत्याने कटर मशीनने कापला तीन पुतण्यांचा गळा, त्याआधी नेमकं काय घडलं?

एका चुलत्याने आपल्या तीन अल्पवयीन निष्पाप पुतण्यांची कटर मशीनने गळा चिरुन निर्घृण हत्या केली आहे. किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलले.

Crime News

Crime News

पंकजा मुंडे

28 Mar 2026 (अपडेटेड: 28 Mar 2026, 12:16 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

रुममध्ये मोठ्याने गाणी लावली अन्

point

चुलत्याने कटर मशीनने कापला तीन पुतण्यांचा गळा

point

धक्कादायक प्रकरण

Crime News : एका चुलत्याने आपल्या तीन अल्पवयीन निष्पाप पुतण्यांची कटर मशीनने गळा चिरुन निर्घृण हत्या केली आहे. किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलले. हत्या करताना आरोपीने मोठ्या आवाजात गाणी लावल्याने कटरचा आवाज कोणालाच ऐकू आले नाही.  या थरारक हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

दरवाजा उघडण्यास उशीर झाला म्हणून...

मिळालेल्या माहितीनुसार अनीश कुमार (10 वर्षे), आयुष कुमार (7 वर्षे) आणि अनुष्का कुमारी (5 वर्षे) यांची त्यांचा सख्खा काका अमंत पाल याने हत्या केली. शुक्रवारी (27 मार्च) सकाळी आरोपी घराबाहेर गेला होता. परतल्यानंतर त्याने दरवाजा ठोठावला, मात्र मुलांची आई अनिता देवी बाथरुममध्ये असल्याने दरवाजा उघडण्यास उशीर झाला. हाच राग मनात धरून आरोपीने घरात प्रवेश करताच गाण्यांचा आवाज मोठा केला, जेणेकरून मुलांचा टाहो कोणाला ऐकू येऊ नये.

हे ही वाचा : विवाहित प्रेयसीच्या घरात घुसला प्रियकर, पण समोर नवराच दिसला अन् भयंकर घडलं

कटर मशीनने चिरले गळे

यानंतर आरोपीने क्रूरतेचा कळस गाठत घरातील 'कटर मशीन'ने तिन्ही मुलांचा एकामागून एक गळा चिरला. अवघ्या काही मिनिटांत हसत्या-खेळत्या मुलांचा रक्ताच्या थारोळ्यात अंत झाला. हे भीषण कृत्य केल्यानंतर आरोपीने स्वतःचाही गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलांच्या ओरडण्याचा आवाज आणि घरातून वाहणारे रक्त पाहून गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

हे ही वाचा : अशोक खरातच्या HIV टेस्टचा रिपोर्ट आला समोर, स्वत:च्या ऑफिसमध्ये शेकडो महिलांसोबत करायचा नको ते!

राज्यात संतापाची लाट

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. मुलांचे वडील गुड्डू पाल हे रेल्वेच्या पँट्री कारमध्ये काम करतात आणि घटनेच्या वेळी ते कामावर होते. अद्याप हत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी, एका लहरी काकाने अशा प्रकारे पुतण्यांचा बळी घेतल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.