अशोक खरातच्या HIV टेस्टचा रिपोर्ट आला समोर, स्वत:च्या ऑफिसमध्ये शेकडो महिलांसोबत करायचा नको ते!

मुंबई तक

Ashok Kharat HIV Test: अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं होतं. याच प्रकरणी पोलिसांनी त्याला अटकही केली. याच अशोक खरातच्या HIV टेस्टचा आता नेमका रिपोर्ट समोर आल आहे.

ADVERTISEMENT

hiv test report of ashok kharat who sexually assaulted hundreds of women inside his own office has surfaced
Ashok Kharat HIV Test
google news

नाशिक: नाशिक येथील अशोक खरात बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणी नवनवी धक्कादायक माहिती समोर येत आहे. महिलांचे भविष्य सांगण्याच्या नावाखाली त्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांदरम्यान, या प्रकरणी आत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पोलीस कोठडीत असताना अशोक खरातची एचआयव्ही चाचणी (HIV Test) करण्यात आली होती. त्याचा वैद्यकीय अहवाल आता समोर आला आहे.

अशोक खरातच्या HIV Test चा रिपोर्ट

मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय तपासणीचा भाग म्हणून अशोक खरातची एचआयव्ही चाचणी करण्यात आली होती. आता त्याचा अहवाल प्रसिद्ध झाला असून, तो निगेटिव्ह असल्याचे आढळले आहे. क्रूर अत्याचाराला बळी पडल्यानंतर संसर्गाच्या भीतीने त्रस्त असलेल्या शेकडो पीडितांसाठी ही माहिती दिलासादायक आहे.

हे ही वाचा>> शक्तीवर्धक औषधांच्या अतिसेवनाने अशोक खरातला आलेला अर्धांगवायूचा झटका; अजूनही...

नाशिक न्यायालयाने खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) या प्रकरणाचा जलदगतीने तपास सुरू आहे.

100 हून अधिक महिलांच्या शोषणाचे आरोप

आतापर्यंतच्या तपासात असे उघड झाले आहे की, आरोपीने तरुणी, विवाहित महिला आणि गर्भवती महिलांसह 100 हून अधिक महिलांना आपल्या बळी बनवले आहे. नाशिक पोलिसांकडे नोंद असलेल्या आठ प्रकरणांपैकी सात प्रकरणे थेट महिलांवरील बलात्काराशी संबंधित आहेत. अनेक पीडित महिला अजूनही पुढे येण्यास घाबरत असल्याचे पोलिसांचे मत आहे.

हे वाचलं का?