शक्तीवर्धक औषधांच्या अतिसेवणामुळे अशोक खरातला आला होता अर्धांगवायूचा झटका; अजूनही पुर्णपणे रिकव्हर नाही
Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरात सोशल मीडिया व डिजिटल प्लॅटफॉर्मचा हुशारीने वापर करायचा. येणाऱ्या भक्तांची तो नातेवाईक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळवत असे. त्यानंतर संबंधितांना सांगून आपल्याकडे दिव्यशक्ती असल्याचा भास निर्माण करायचा.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शक्तीवर्धक औषधांच्या अतिसेवणामुळे अशोक खरातला आला होता अर्धांगवायूचा झटका
अजूनही पुर्णपणे रिकव्हर नाही
Ashok Kharat Case, प्रवीण ठाकरे : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात रोज नवीन खुलासे झालेला पाहायला मिळत आहेत. दरम्यान, आता SIT पथकाने खरातची HIV टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. मात्र दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या खरातला दीड वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा सौम्य झटका आला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. विशेष म्हणजे, शक्तीवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे झाला होता. खरात आपली लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी शक्तिवर्धक आणि उत्तेजक औषधांचे मोठ्या प्रमाणात सेवन करत होता. या औषधांच्या अतिसेवनामुळे त्याला अर्धांगवायूचा झटका बसला. दीड वर्ष उलटल्यानंतरही खरात पूर्णपणे बरा झालेला नाही. त्याच्या एका हाताची हालचाल आजही मर्यादित आहे. त्याच्या भुवया खाली-वर दिसून येतात, जे अर्धांगवायूच्या झटक्याचे लक्षण मानले जाते. यावर त्याने भाविकांच्या पैश्यावर अमेरिकेत उपचार केल्याची चर्चा आहे.
हेही वाचा : Personal Finance: चांदी तब्बल 15,000 रुपयांनी घसरली... सोनंही गडगडलं! पण असं घडतंय तरी का?
अशोक खरातच्या ऑफिसची SIT कडून झाडाझडती
SIT ने गुरुवारी खरातच्या ऑफिसमध्ये जाऊन पंचनामा केला. यावेळी महिलांच्या केसांच्या बटा, तांब्याची संशयित बाटली, तंत्र-मंत्रासाठीचे गंडेदोरे, पूजाविधीचे साहित्य,आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, डिजिटल पुरावे, आणि एक स्प्रे आढळला. हे सगळं साहित्य जप्त करुन पुढील तपासासाठी नाशिक व पुणे येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळांकडे पाठविण्यात आले आहे.
हेही वाचा : Daily Horoscope : मीन राशीच्या लोकांना आज हवं ते मिळणार, तुमचा आजचा दिवस कसा असणार, जाणून घ्या









