Crime News : उत्तर प्रदेशातील जहांगीराबाद पोलीस ठाणे परिसरात एका महिलेनं, पती आणि होमगार्ड भाच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी आणि त्याच्या होमगार्ड भाच्याला अटक केली, या प्रकरणी होमगार्डला निलंबित करण्यात आले होते. होमगार्डचे नाव श्योराज सिंह असे आहे, तर पतीचं नाव लाल सिंह असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : भिवंडीत 10 वर्षीय चिमुकलीकडून 58 वर्षीय वृद्धावर अत्याचार केल्याचा आरोप, परिसरात संतापाची लाट
दोघांनी पीडितेला गाडीत बसवले अन् थंड प्येय पाजून नको तेच...
पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीडितेनं सांगितलं की, 19 मार्च रोजी जहांगीराबाद येथील एका डॉक्टरांकडून औषध आणायला जाताना, नवरा आणि भाचा होमगार्डने तिला गाडीत बसवले आणि तिला एक थंड प्येय प्यायला दिल्यानंतर ती तिथेच बेशुद्ध अवस्थेत पडली. संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, तिच्यावर एका हॉटेलमध्ये सामूहिक अत्याचार करण्यात आला आणि तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी देखील दिली. महिला आपल्या कुटुंबासह एका पोलीस ठाण्यात गेली आणि तिथे तिच्यावर तक्रार दाखल करण्यात आली.
पीडितेकडून प्रतिकार अन् आरोपीनं दिली धमकी
कोतवाली प्रभारी निरीक्षक कुमार सिंह यांनी सांगितलं की, महिलेनं तक्रारीच्या आधारे, तक्रारीच्या आधारे होमगार्ड विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान मंगळवारी सकाळी ती गोशाळेत जात होती, तेव्हा गावातील एक तरुण घटनास्थळी आला होता. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. तिने प्रतिकार केला असता, आरोपीकडून तिला धमकी दिली.
हे ही वाचा : डॉक्टरचं 25 वर्षीय शेजारणीवर जीवापाड प्रेम, ह्रदयविकाराचा झटका अन् सीएनजी किटचा स्फोट; हादरवणारं प्रकरण
महिला व्हिवळतानाचा आवाज ऐकून नातेवाईक घटनास्थळी धावून आले. त्यांनी पाहून आरोपी पळून गेला. घटनेनंतर, जेव्हा पीडितेचे नातेवाईक तक्रार करण्यासाठी आरोपीच्या घरी गेले, तेव्हा आरोपीच्या भावाने त्यांना गोळ्या घालून मारण्याची धमकी दिली होती. तक्रारीच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











