Crime News : पती-पत्नीमधील किरकोळ वादाचे रुपांतर एका भीषण हत्येत झाल्याची घटना समोर आली आहे. नवऱ्याने रागाच्या भरात आपल्या पत्नीच्या डोक्यात इस्त्रीने प्रहार करून तिची हत्या केली. काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेल्या या सुखी संसारात इतका भयानक अंत होईल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, तीन वर्षांच्या चिमुरडीच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले आहे.
ADVERTISEMENT
2021 मध्ये प्रेमविवाह
उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये राहणाऱ्या हेमंत वर्माची काही वर्षांपूर्वी पंजाबमधील गुरुदासपूर येथील स्वीटाशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि 2021 मध्ये दोघांनी कायदेशीररीत्या कोर्ट मॅरेज केले. हेमंत हा बॅग दुरुस्तीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. त्यांना एस्टर नावाची तीन वर्षांची मुलगी असून बुधवारी रात्री सर्वांनी एकत्र जेवण केले होते, मात्र त्यानंतर सुरू झालेल्या एका वादाने हिंसक वळण घेतले.
हे ही वाचा : दुर्गा देवीच्या यात्रेत 3 वर्षाच्या चिमुरडीला बघून अज्ञात व्यक्ती नराधम झाला, मंदिरामागे नेत केले शोषण, रक्ताने माखलेली पँट...
रात्री झोपण्यापूर्वी वाद
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री झोपण्यापूर्वी हेमंत आणि स्वीटामध्ये कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला. वाद इतका वाढला की हेमंतने रागाच्या भरात घरातील इलेक्ट्रिक इस्त्री उचलली आणि स्वीटाच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. या हल्ल्यात स्वीटाचे डोके फुटले आणि प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला देण्यात आली, ज्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी हेमंतला ताब्यात घेतले.
हे ही वाचा : भाड्यावरुन वाद झाला, भाडेकरुने थेट मालकाच्या 8 वर्षाच्या मुलीलाच संपवले अन् मृतदेह पिठाच्या डब्यात लपवून पळाला
आरोपीची चौकशी सुरु
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवला असून, प्राथमिक तपासात या हत्येचे कारण घरगुती कलह असल्याचे समोर येत आहे. पोलीस सध्या आरोपी पतीची कसून चौकशी करत असून, नेमका वाद कशामुळे झाला याचा शोध घेत आहेत. एका छोट्या वादाची एवढी मोठी शिक्षा स्वीटाला आपल्या जिवाने द्यावी लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT











