Anjali Damania On Narhari Zirwal : नरहरी झिरवाळ यांचा एका तृतीयपंथीयासोबतचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याविषयी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, 'एकदाच ते त्या व्यक्तीला भेटले असं नाही, तर असंख्य फोटो मी माझ्या ब्रॉडकास्ट ग्रुपवर टाकले आहेत. हे जे पवन यादव आहेत ते प्रत्येकाला भेटायचे. सगळ्या राजकारण्यांबरोबर त्यांचे नेहमीप्रमीणे फोटो आहेत.' तसेच एका विधानसभेत जाऊन यादव यांनी भाषण केले आहे, असा दावा दामानिया यांनी केला. आज (26 मार्च) आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी नरहरी झिरवाळ यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओ विषयी भाष्य केले.
ADVERTISEMENT
झिरवाळांबद्दल काय म्हणाल्या दमानिया?
या पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना दमानिया म्हणाल्या की, 'आताच्या घटकेला काही लोक म्हणताहेत की जे झालं ते दोघांच्या मान्यतेनं झालं. मात्र मला असं वाटतं की, हे सगळं शासकीय जागेत केलं गेलं, हा पहिला प्रश्न. तिथे दारुच्या बाटल्या दिसताहेत. हे व्हिडिओ शूटिंग ब्लॅकमेलिंगसाठी केलं गेलं याच्यात काहीच शंका नाही. पण आपण करतोय काय याचं भान असणं गरजेचं होतं,' असं अंजली दमानिया म्हणाल्या.
हे ही वाचा : मर्सिडीज गाडी, 21 देशात भ्रमण, फार्म हाऊसवर टर्किश किचन अन् फर्निचर; अशोक खरातने व्यावसायिकाला किती लुटलं?
सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवायला हवं
यापुढं बोलताना दमानिया म्हणाल्या की, 'हे सगळं बघून राजकारण आपण कोणत्या स्थितीला नेतोय याचा महाराष्ट्राने गंभीर विचार करावा. खरं तर सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवायला हवं. ही जी घाण चाललीये ती कुठेतरी थांबवा. या सगळ्याला कुठेतरी आळा घाला. हे सगळं बघून किळस येतीये की काय करताहेत ही माणसं! या बाबतीत मला अनेक गोष्टी समजल्या आहेत. मात्र त्या मला माध्यमांसमोर मांडता येणार नाहीत.'
हे ही वाचा : मोठी बातमी: पार्थ पवारांच्या मामेभावावर कारवाई होणार, पण... पुण्यातील जमीन प्रकरणाचा रिपोर्ट आला समोर
पक्षाला लाजीरवाणं नाही का वाटत?
झिरवाळांच्या राजीनाम्याविषयी बोलताना दमानिया म्हणाल्या की, 'अशा नेत्यांना त्यांच्या पक्षात ठेवणं हे पक्षाला लाजीरवाणं नाही का वाटत? त्या पक्षाला नाही का वाटत आपण काहीतरी सुधारणा करावी. लोकांना काहीतरी चांगलं द्यावं. मला वाटतं प्रत्येक पक्षानं ही जबाबदारी घ्यायला पाहिजे. अशा नेत्यांना तात्काळ राजीनामा द्यायला भाग पाडलं पाहिजे आणि त्यांनी तो दिला नाही तर त्यांना काढून टाकलं पाहिजे.'
ADVERTISEMENT











