Crime News : विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून एका महिलेने तिच्या प्रियकर आणि त्याच्या साथीदाराच्या मदतीने स्वतःच्या पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा उलगडा करत पोलिसांनी मृत व्यक्तीची पत्नी आणि तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे मृत दाम्पत्याला एकूण नऊ मुले आहेत. त्यामध्ये आठ मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. चार मुलींचे विवाह झाले असून चार लहान मुली आणि एक लहान मुलगा आता आई-वडील दोघांच्याही आधारापासून वंचित झाले आहेत. वडिलांचा मृत्यू झाला असून आई हत्या प्रकरणात तुरुंगात गेल्याने या मुलांचे भवितव्यही अनिश्चित झाले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : बायकोनं गरीब नवऱ्याच्या डोक्यात मोबाईल घातला, कोच पडून भळाभळा रक्त, अखेर दुर्दैवी अंत
मृत्यू नैसर्गिक वाढला, पण पुढे हत्या झाल्याचे उघड
माहितीनुसार, गणेशपुरा गावातील गमाभाई ठाकोर हे गेल्या चार वर्षांपासून कुटुंबासह शेतमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. 8 जुलै रोजी त्यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि थराद पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे वाटत होते. मात्र, शवविच्छेदन अहवालात हा मृत्यू हत्या असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. तपासादरम्यान गमाभाई यांची पत्नी नर्मदा उर्फ नबाबेन हिचे गावातील प्रेमजी पटेल याच्यासोबत विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या दृष्टीने तपास सुरू केला.
हेही वाचा : 'कायदा सर्वांना समान', चुकीच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींना तुकाराम मुंढेंचा इशारा
खाटेवर झोपवले आणि दोरीने गळा आवळून हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी गमाभाई शेतात काम करून सायंकाळी घरी परतले. घरी आल्यानंतर त्यांनी पत्नी नर्मदा हिला प्रेमजी पटेल आणि मुकेश ठाकोर यांच्यासोबत पाहिले. याच कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये तीव्र वाद झाला. वादाच्या दरम्यान नर्मदाने लाकडी फळीने गमाभाई यांच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे ते खाली कोसळले. त्यानंतर नर्मदा, प्रेमजी पटेल आणि मुकेश ठाकोर यांनी मिळून त्यांना खाटेवर झोपवले आणि दोरीने गळा आवळून त्यांची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. ही घटना लपवण्यासाठी दुसऱ्या दिवशी आरोपींनी कुटुंबीय आणि गावकऱ्यांना गमाभाई यांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचे सांगितले.
मात्र, शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या सखोल चौकशीत संपूर्ण कट उघडकीस आला. मृताच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून थराद पोलिसांनी हत्या, गुन्हेगारी कट रचणे आणि संबंधित अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर तातडीने कारवाई करत पत्नी नर्मदा उर्फ नबाबेन, प्रेमजी पटेल आणि मुकेश ठाकोर या तिघांना अटक करण्यात आली. दियोदरचे डीवायएसपी यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात मिळालेल्या पुराव्यांवर, शवविच्छेदन अहवालावर आणि चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार हत्येच्या कटाचा उलगडा झाला आहे. सध्या तिन्ही आरोपींना पोलिस कोठडीत ठेवून प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा तपास सुरू आहे. ही हत्या आधीपासून आखलेल्या कटाचा भाग होती की वादाच्या भरात घडली, याचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील वाव-थराद परिसरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT












