घरातल्या टीव्हीचा आवाज 100 पर्यंत वाढवला, नवऱ्याने उर्मिलासोबत काय केलं?

मुंबई तक

• 07:44 AM • 15 Jul 2026

MP Crime News : इंदूरमधील उर्मिला सैनी हत्याकांडात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिस तपास आणि मुलीच्या जबाबातून हत्या पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे समोर आले आहे.

MP Crime News

MP Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

घरातल्या टीव्हीचा आवाज 100 पर्यंत वाढवला

point

नवऱ्याने उर्मिलासोबत काय केलं?

MP Crime News : मध्य प्रदेशातील इंदूर येथे 38 वर्षीय पोस्टल असिस्टंट उर्मिला सैनी यांच्या हत्याप्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिस तपास तसेच मृत महिलेची मुलगी प्रेक्षा हिने दिलेल्या जबाबातून ही हत्या रागाच्या भरात झालेली नसून पूर्णपणे नियोजनबद्ध कटाचा भाग असल्याचे स्पष्ट होत आहे. आरोपी पती अखिलेश सैनी याने हत्येपूर्वी प्रत्येक गोष्टीचे बारकाईने नियोजन केले होते, जेणेकरून आपल्या कृत्याचा कोणालाही संशय येऊ नये. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने गुन्हा करण्यापूर्वी आणि त्यानंतरची प्रत्येक हालचाल आधीच ठरवून ठेवली होती.

हे वाचलं का?

हेही वाचा : बायकोनं गरीब नवऱ्याच्या डोक्यात मोबाईल घातला, कोच पडून भळाभळा रक्त, अखेर दुर्दैवी अंत

आरोपीच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नव्हता

पोलिस तपासात समोर आले आहे की, पत्नीची हत्या केल्यानंतरही आरोपीच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नव्हता. त्याने रक्ताने माखलेले कपडे घराजवळील एका चेंबरमध्ये फेकून दिले. त्यानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घातले, केसांना तेल लावले आणि कपाळावर टिळा लावून तो थेट आपल्या मुलगी प्रेक्षा आणि मुलगा अव्यक्त यांच्या शाळेत पोहोचला. तेथे त्याने मुलीकडे आईचा नेकलेस, घराची चावी आणि एटीएम कार्ड दिले. तसेच शाळा सुटल्यानंतर मावशीच्या घरी जाण्यास सांगितले आणि त्यानंतर तेथून फरार झाला. या संपूर्ण घटनाक्रमामुळे आरोपीने गुन्ह्यानंतरही स्वतःवर कोणताही संशय येऊ नये, यासाठी नियोजन केल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा : 'कायदा सर्वांना समान', चुकीच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींना तुकाराम मुंढेंचा इशारा

आरोपीने टीव्हीचा आवाज 100 वर ठेवला अन् पत्नीला संपवलं 

प्रेक्षा हिने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, शाळेतून घरी परतल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा उघडा होता आणि घरातील टीव्हीचा आवाज अत्यंत मोठा होता. आरोपीने टीव्हीचा आवाज 100 वर ठेवला होता, जेणेकरून उर्मिला यांच्या ओरडण्याचा आवाज शेजाऱ्यांपर्यंत पोहोचू नये. घराच्या पहिल्याच खोलीत उर्मिला यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना घरातून मेडिकल नाइफ बॉक्सही सापडला आहे. या प्रकारच्या चाकूचा वापर मोठ्या शस्त्रक्रिया किंवा डिलिव्हरीदरम्यान खोल चिरे देण्यासाठी केला जातो. नातेवाईकांचा दावा आहे की, आरोपीने सात थरांपर्यंत कापता येणारा विशेष मेडिकल चाकू ऑनलाइन मागवला होता आणि त्याचाच वापर करून ही हत्या केली. पोलिस या दाव्याची आणि जप्त केलेल्या साहित्याची पडताळणी करत आहेत.

पोस्टमॉर्टम अहवाल आणि नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सर्वप्रथम उर्मिला यांच्या डोक्यावर जड वस्तूने वार केला, जेणेकरून त्या प्रतिकार करू शकणार नाहीत. त्यानंतरही त्याची क्रूरता थांबली नाही. मृतदेहाचा जबडा तुटलेला होता, चार दात तुटलेले आढळले, गळा चिरलेला होता आणि चेहऱ्यावर अनेक ठिकाणी चाकूने वार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे हत्येपूर्वीचे नियोजन आणि गुन्हा करण्याची पद्धत अधिक स्पष्ट होत असून, पोलिस सर्व बाबींचा सखोल तपास करत आहेत.