Crime News : तरुणाने आपल्या प्रेयसीचा गळा चिरून तिची हत्या केली. नंतर त्या तरुणाने रेल्वेखाली जाऊन जीवन संपवलं. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची ओळख छत्तीसगढचे भिलाई निवासी श्रेष्ठ मलिक (वय 25) आणि प्रेयसी इशारा अयूबी (वय 25) अशी ओळख समोर आली. दोघेही एकाच कंपनीत काम करत होते. ही घटना हरियाणाच्या गुरूग्राममध्ये घडली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : आईनं पोटच्या लेकीला पैशांसाठी वेश्याव्यवसायात ढकललं, 40 हजार रूपयांच्या कमाईचे दिले वचन
गुरूग्राम मलिक सेक्टर 55 येथे श्रेष्ठ मलिक पेईंग गेस्ट म्हणून राहत होता. या घटनेची माहिती समोर आली असता, अयूबीच्या कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी सेक्टर 56 येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत अयूबीच्या मोबाइलचे लोकेशन ट्रॅक करण्यात आले.
अयूबीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात
लोकेशन ट्रॅक केल्यानंतर त्यांना घटनास्थळ आढळून आलं. शेजारच्यांना या घटनेबाबत विचारपूस केली होती. पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडून ते आत गेले. खोलीत अयूबीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. चारी बाजूला रक्त पसरलेलं होतं.
रेल्वे ट्रॅकवर तरुणाने उडी मारत संपवलं जीवन
प्राथमिक तपासातून माहिती समोर आली की, प्रियकराने अयूबीची चाकूने भोसकून हत्या केली होती. अशातच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेत निरीक्षण केले. तपासादरम्यान, पोलिसांनी रेल्वे ट्रॅकवरून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाचे दोन तुकडे झाले होते.
हे ही वाचा : बायकोनं गरीब नवऱ्याच्या डोक्यात मोबाईल घातला, कोच पडून भळाभळा रक्त, अखेर दुर्दैवी अंत
अयूबी ही मलिकसोबत मृत्यूच्या तीन दिवसांपूर्वीच पीजी म्हणून राहण्यास आली होती. सेक्टर 56 च्या ठाणे प्रभारी निरीक्षक मनोज कुमारने सांगितलं की, प्रकरणाचे प्रत्येक पैलूंचा तपास करत आहोत. दोन्ही व्यक्तींमधील स्वरुप आणि घटनेमागील करणे तपास पूर्ण झाल्यावर समोर येतील. अशातच पोलिसांनी फोन कॉल्स, चॅट्स आणि इतर तांत्रिक पुराव्यांचीही तपासणी करत आहेत.
ADVERTISEMENT












