पुरोगामी कोल्हापुरात सुनेचा छळ, बारशापूर्वी आईनं गळफास घेत संपवलं जीवन

मुंबई तक

13 Jul 2026 (अपडेटेड: 13 Jul 2026, 05:11 PM)

Kolhapur suicide : कोल्हापुरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने टोकाची भूमिका घेत जीवन संपवलं. कोल्हापूरच्या राजारामपुरातील महिलेनं 12 जुलै रोजी दुपारी गळफास घेत जीवन संपवलं. पीडित मृत महिलेची ओळख समोर आली.

Kolhapur suicide

Kolhapur suicide

Google CTA

बातम्या हायलाइट

point

लग्न झाल्यापासून पीडितेचा पैशांसाठी छळ सुरू 

point

फॅनला ओढणीने गळफास घेत संपवलं जीवन

Kolhapur Suicide : दिपक सूर्यवंशी - कोल्हापुरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने टोकाची भूमिका घेत जीवन संपवलं. कोल्हापूरच्या राजारामपुरातील महिलेनं 12 जुलै रोजी दुपारी गळफास घेत जीवन संपवलं. जीवन संपवलेल्या महिलेची अस्मिता प्रतीकसिंह काटकर अशी ओळख समोर आली. अस्मिताने उचललेल्या या टोकाच्या भूमिकेनं धक्कादायक प्रकार समोर आला. महिलेच्या हत्येवर आई वडिलांनी सासरच्यांना जबाबदार धरलं आहे. या प्रकरणात सासरच्या मंडळींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नागपूरमध्ये नराधमाचा गायीवर लैंगिक अत्याचार, आरोपी विवाहित असल्याची माहिती

लग्न झाल्यापासून पीडितेचा पैशांसाठी छळ सुरू 

मुलीने जीवन संपवलं नसून तिची हत्या आहे. लग्न झाल्यापासून पैशांसाठी अस्मिताचा छळ सुरू होता. रोख रक्कम आणि ऑनलाईन पद्धतीने सासरच्यांना पैसे पाठवण्यात आले होते. मुलीच्या बारशासाठी तब्बल 52 हजार रुपयांचा पाळणा ऑनलाईन ऑर्डर करण्यात आला होता. अशातच काटकर कुटुंबीयांनी आमच्या मुलीची सासू ,सासरे ,नणंद ,आणि पती यांनी मिळून छळ केल्याचा आरोप केला. पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत, अशातच कुटुंबाीयांनी आरोप केला की, सासऱ्यांना आबासाहेब, सासूला माॅ साहेब, तसेच नणंदेला राणीसाहेब तर पतीला सरकार असं मान सन्मानाने हाक मारण्याचा दबाव आणला जात होता. 

अस्मिताचे वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. सासरी आर्थिक स्थिती चांगली आहे. एक महिन्याची मुलगी असताना अस्मिताने आपलं जीवन का संपवलं? असा प्रश्न उपस्थित होण्यासारखा आहे. याच घटनेचा उलगडा करण्याचे काम पोलिसांनी केलं आहे. 

हे ही वाचा : प्रेम विवाहाला आईचा विरोध, जावयाने सासूची कुऱ्हाडीने केली हत्या

फॅनला ओढणीने गळफास घेत संपवलं जीवन

पोलीस तपासातून अस्मिताच्या गळ्याला जखमा आढळून आल्या होत्या.  महिन्याभराच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वी पीडितेनं फॅनला ओढणीने गळफास घेत जीवन संपवलं. अशातच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला होता.