प्रेम विवाहाला आईचा विरोध, जावयाने सासूची कुऱ्हाडीने केली हत्या

मुंबई तक

13 Jul 2026 (अपडेटेड: 13 Jul 2026, 02:13 PM)

Crime News : महिलेनं मुलीच्या लव्ह मॅरेजला विरोध होता, तिने आपल्या आईचं काहीही एक ऐकलं नाही. आईचा शेवटवर्यंत तिच्या नातेसंबंधाला विरोध होता. हिच बाब मुलीच्या नवविवाहित नवऱ्याला खटकली होती. हाच राग मनात धरून जावयाने आपल्याच सासूवर कुऱ्हाडीने हल्ला करत तिची हत्या केली.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पळून जाऊन दोघांनी केला विवाह 

point

तरुणीच्या आईचा लग्नास विरोध 

point

जावयाने सासूला संपवलं 

Crime News : महिलेनं मुलीच्या लव्ह मॅरेजला विरोध होता, तिने आपल्या आईचं काहीही एक ऐकलं नाही. आईचा शेवटवर्यंत तिच्या नातेसंबंधाला विरोध होता. हिच बाब मुलीच्या नवविवाहित नवऱ्याला खटकली होती. हाच राग मनात धरून जावयाने आपल्याच सासूवर कुऱ्हाडीने हल्ला करत तिची हत्या केली. अशातच पोलीस पथक आणि फॉरेन्सिक पथकाने प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील बांदा येथील आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : एसआरआय फॉर्म भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर अत्याचार, चौघांनी मिळून..

पळून जाऊन दोघांनी केला विवाह 

संबंधित प्रकरण हे बांदा येथील बिसंडा ठाणे क्षेत्रातील कोर्रही गावातील आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिलेच्या मुलीचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांचा धर्म वेगळा होता. काही महिन्यांपूर्वी ते दोघेही घरातून पळून गेले आणि त्यांनी कथितरित्या विवाह केला. त्यानंतर तरुणी आपल्या पतीसोबत राहू लागली होती. 

तरुणीच्या लग्नास विरोध केल्याने जावयाने सासूला संपवलं 

सांगितले जातेय की, तरुणीची आई गंभीर असून नातेसंबंधाला तिचा विरोध होता. दोघांचाही धर्म वेगळा असल्याने यावरून अनेकदा वादविवाद देखील झाला होता. कुटुंबीयांचा असा आरोप होता की, तरूणीचा नवरा लवकुशने आपल्या पत्नीच्या माहेरी जाऊन दोन साथीदारांच्या मदतीने सासूची कुऱ्हाडीने हत्या केली.  

या घटनेनंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली असता, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन केले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून काही पुरावे गोळा केले होते. या प्रकरणाचा खुलासा देखील केला होता. 

हे ही वाचा : मुंबईत 9 वर्षीय मुलीवर वॉचमनचा अत्याचार, गोडाऊनमध्ये नेलं अन्..

मृत महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, मुलीचे तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्यानंतर तिने संबंधित तरुणाशी विवाह केला. तेव्हापासून कुटुंबात तणावाचं वातावरण निर्माण झालं.  जर मुलीने विवाह केला नसता, तर तिची आई आज जीवंत असती. घटनेनंतर कुटुंबाचे रडून रडून अगदी वाईट हाल झाले.