महिलेनं मेहंदीनं हातावर लिहिली सुसाईड नोट, नंतर विष पिऊन संपवलं जीवन

मुंबई तक

12 Jul 2026 (अपडेटेड: 12 Jul 2026, 05:18 PM)

crime news : महिलेनं कथितरित्या विषारी पदार्थ खाऊन जीवन संपवलं. तिने यापूर्वी मेहंदीने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती. पीडितेची तब्येत बिघडल्याने तिला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशातच पोलीस प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पीडितेच्या सुसाईड नोटमुळे जीवन संपवल्याचा पोलिसांना संशय 

point

साईड नोटमध्ये काय? 

Crime News : मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेनं कथितरित्या विषारी पदार्थ खाऊन जीवन संपवलं. तिने यापूर्वी मेहंदीने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती. पीडितेची तब्येत बिघडल्याने तिला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पीडितेची प्रीती वर्मा (वय 32) अशी ओळख समोर आली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बाप लेकीच्या नात्याला काळिमा! वडिलांचा मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडितेनं पेट्रोल टाकून घेतलं पेटवून

पीडितेच्या सुसाईड नोटमुळे जीवन संपवल्याचा पोलिसांना संशय 

पीडितेच्या हातावर असलेल्या सुसाईड नोटमुळे तिने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय बळावला होता. अशातच पीडितेच्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, परिस्थिती आणखी गंभीर होऊ लागली होती. यानंतर आणखी चांगल्या उपचारासाठी तिला एका रूग्णालयात भरती करण्यासाठी हलविले.  अथक प्रयत्न करून देखील प्रीती वर्मा वाचली नाही, अखेर तिचा मृत्यू झाला.  

साईड नोटमध्ये काय? 

पोलिसांच्या तपासातून माहिती समोर आली की, विष प्राशन करण्यापूर्वी पीडितेनं आपल्या हातावर मेहंदीने सुसाईड नोट लिहिली होती. संबंधित सुसाईड नोटमध्ये तिने छळाचे वर्णन केले. अशातच पोलीस तिची सुसाईड नोट पुरावा म्हणून महत्त्वाचा तपशील मानत आहे. 

हे ही वाचा : बाईक चोरीचा संशय, तरुणाला विजेचा शॉक; Video व्हायरल

रुग्णालयात दाखल असताना, प्रीतीची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरांनी ठरवलं की, पीडितेची प्रकृती खालावल्याने तिच्याकडून मृत्यूपूर्वी जबाब नोंदवणे कठीण होऊन बसले होते. तिच्याच शरीरावर लिहिण्यात आलेल्या मेहंदीच्या सुसाई़ड नोटचे महत्त्व अधिक आहे. पोलिसांचं म्हणणे असे होते की, सुसाईड नोट घटनेमागील खरी परिस्थिती दाखवण्यास अधिक मदत करतो.