मुंबईत मुलीला डोंगरावरून ढकलून दिलं, लोहगड प्रकरणाची पुनरावृत्ती

मुंबई तक

11 Jul 2026 (अपडेटेड: 11 Jul 2026, 03:11 PM)

Mumbai Crime : पुण्यातील सिया गोयल आणि केतन अग्रवाल प्रकरणाने महाराष्ट्र हादरून गेला आहे. त्यानंतर असाच एक प्रकार मुंबईतील कांदिवली पूर्व परिसरातील समतानगर येथे घडला आहे. एकाने अल्पवयीन गर्लफ्रेंडला उंच डोंगरावरून धक्का दिला. पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करत आरोपीला 24 तासांतच ताब्यात घेत अटक केली. 

Mumbai crime

Mumbai crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

डोंगरळा ठिकाणी अल्पवयीन मुलीचा मृतदेह

point

तरुणीला डोंगरावरून दिलं ढकलून

point

सिया गोयल आणि केतन अग्रवाल प्रकरणासारखी घटना

Mumbai Crime : पुण्यातील सिया गोयल आणि केतन अग्रवाल प्रकरणाने महाराष्ट्र हादरून गेला आहे. त्यानंतर असाच एक प्रकार मुंबईतील कांदिवली पूर्व परिसरातील समतानगर येथे घडला आहे. एकाने अल्पवयीन गर्लफ्रेंडला उंच डोंगरावरून धक्का दिला. पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करत आरोपीला 24 तासांतच ताब्यात घेत अटक केली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : शनीच्या भ्रमणात बदल, 'या' राशीतील लोकांची आव्हाने वाढतील

डोंगराळ ठिकाणी अल्पवयीन मुलीचा मृतदेह

पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी दामूनगर परिसरातील मागील भागातील असलेल्या डोंगराळ ठिकाणी एक अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला होता. समतानगर पोलिसांनी पोलीस क्राइम ब्रांच आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने शोध सुरू ठेवला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. 

तरुणीला डोंगरावरून दिलं ढकलून

पोलिसांनी तक्रारीच्या दरम्यान आसपासच्या परिसरात जाऊन तपास केला. तरुणी हरवल्याची तक्रार दाखल केली. मृत्यू झालेल्या तरुणीचे सूरज मारुती वाघमारे नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्यानेच तिला डोंगरावरून ढकलून दिलं होतं. 

हे ही वाचा : 23 वर्षीय प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेला अन् गमावला जीव, 19 वर्षीय तरुणासोबत काय घडलं?

आरोपी हा पेहरावावरून डिलिव्हरी बॉय असल्याचा संशय

तांत्रिकदृष्ट्या इनपुट आणि माहितीच्या आधारे, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू ठेवला होता. तपासातून आरोपीची चूक समोर आल्यानंतर त्याला अटक केली. आरोपी हा पेहरावावरून डिलिव्हरी बॉय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस घटनेचा तपास करत असल्याची माहिती समोर आली. सुरूवातीला स्पष्ट झालं नाही की, हत्याचं नेमकं कारण काय आहे? आरोपीने रागाच्या भरात असं कृत्य केलं की, ही हत्या सुनियोजित होती? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.