मुंबई: टिव्ही अभिनेत्याला अटक, 16 वर्षीय मुलीचा छळ केल्याचा आरोप

मुंबई तक

11 Jul 2026 (अपडेटेड: 11 Jul 2026, 03:36 PM)

Mumbai crime : मुंबई पोलिसांनी एका टिव्ही अॅक्टरला 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी अटक केली. आरोपीची  रोहित चंदेल (वय 29) अशी ओळख समोर आली. रोहितने 'काशीबाई बाजीराव बल्लाल'मध्ये बाजीराव आणि पांड्या स्टोरमध्ये धवल मकवानाची भूमिका केली होती. अशातच  छळाच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली. 

Mumbai crime

Mumbai crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आरोपीने वेगवेगळ्या फोनवरून पीडितेला त्रास दिला

point

पीडितेला शिवीगाळ करत मारहाण

Mumbai crime : मुंबई पोलिसांनी एका टिव्ही अॅक्टरला 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी अटक केली. आरोपीची  रोहित चंदेल (वय 29) अशी ओळख समोर आली. रोहितने 'काशीबाई बाजीराव बल्लाल'मध्ये बाजीराव आणि पांड्या स्टोरमध्ये धवल मकवानाची भूमिका केली होती. अशातच  छळाच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबईत मुलीला डोंगरावरून ढकलून दिलं, लोहगड प्रकरणाची पुनरावृत्ती

आरोपीने वेगवेगळ्या फोनवरून पीडितेला त्रास दिला

पोलिसांच्या माहितीनुसार, पूर्वी उपनगर येथील रहिवासी 26 वर्षीय मुलीने आरोपी विरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत नमूद करण्यात आलं की, आरोपीने मुलीला सतत फोन केला, वेगवेगळ्या फोन नंबरवरून त्रास दिला. 

पीडितेला शिवीगाळ करत मारहाण

संबधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, 5 जुलै रोजी रोहित चंदेलने मुलीचा पाठलाग केला होता, तिला शिवीगाळ देखील केली होती. मारहाण केली. पोलिसांनी सांगितलं की, पीडिता ही अल्पवयीन असून आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. संबंधित प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. 

आरोपी अभिनेत्यावर गुन्हा दाखल

पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अंतर्गत कलम 78 आणि कलम 115 (2) अन्वये माग काढणे आणि मारहाणप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. अशातच आरोपीला शुक्रवारी त्याच्या दहिसर येथील राहत्या घरी अटक करण्यात आली होती, या घटनेनं परिसर हादरून गेला. 

हे ही वाचा : जामीनावर सुटताच रक्तरंजीत कांड, पत्नी अन् पोरा-बाळांसह 6 जणांची हत्या

आरोपीच्या अटकेनंतर त्याला न्यायालयात दाखल करण्यात आले. नंतर पोलीस कस्टडीत पाठवण्यात आले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.