kerala medical student murder : उझबेकिस्तानमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या केरळमधील 21 वर्षीय सावरिया बसंत हिच्या हत्येप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. सुरुवातीला समोर आलेल्या माहितीपेक्षा हा हल्ला खूपच क्रूर होता, असा दावा त्यांनी केला आहे. सावरियाची हत्या तिच्याच वर्गातील सदरुल अनाम याने केल्याचा आरोप आहे. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने तिच्या डोक्यावर वार केला आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : आठवीच्या विद्यार्थ्यानीवर चोरीचा संशय, शिक्षकांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे घडलं भयानक
तरुणीच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणा
सावरियाचा मृतदेह केरळमध्ये आणल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी अलप्पुझा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला. सावरियाचे काका जनीश यांनी सांगितले की, उझबेकिस्तानमधील तपास अधिकाऱ्यांनी तिच्या संपूर्ण शरीरावर जखमांच्या अनेक खुणा असल्याची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला काही क्षणांत झालेला नव्हता, तर तिच्यावर खूप मारहाण करण्यात आली होती.
हेही वाचा : मिसिंग लिंक : पहाटे तीनची वेळ, समोर कोसळती दरड अन् SOSचं बटण, तरुणांच्या प्रसंगावधानाची चर्चा
सावरियाने धर्मांतर करण्यास दिला होता नकार
जनीश यांनी आणखी एक गंभीर दावा केला आहे. तपासादरम्यान काही विद्यार्थ्यांनी आरोपी सावरियावर धर्मांतरासाठी दबाव टाकत असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले होते. काही विद्यार्थ्यांनी हे स्वतः पाहिल्याचाही दावा करण्यात आला आहे. मात्र सावरियाने धर्मांतर करण्यास नकार दिला होता. ही माहिती भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनाही देण्यात आल्याचे जनीश यांनी सांगितले.
या प्रकरणामागचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र सावरियावर अत्यंत क्रूर पद्धतीने हल्ला झाल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाचे दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्यात आले आहे. तसेच या हत्येचा तपास केरळमध्ये व्हावा आणि उझबेकिस्तानमधील आरोपीला भारतात आणून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
ADVERTISEMENT












