'घरी ये, काम आहे...' 14 वर्षीय विद्यार्थ्यावर शिक्षकाने केला लैंगिक अत्याचार

मुंबई तक

10 Jul 2026 (अपडेटेड: 10 Jul 2026, 02:26 PM)

मुलांना सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकावर 14 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेशातील बलिया येथील एका सरकारी शाळेतील शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'घरी ये, काम आहे...'

point

14 वर्षीय विद्यार्थ्यावर शिक्षकाने केला लैंगिक अत्याचार

Crime News : एका प्राथमिक शाळेच्या शिक्षकावर 14 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. याप्रकरणी तत्परता दाखवत पोलिसांनी पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक केली असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे, शिक्षण विभागानेही या घटनेची गंभीर दखल घेत आरोपी शिक्षकाला तातडीने निलंबित केले असून त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

'काम आहे, घरी ये'

मिळालेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय गुलाम मुस्तफा उर्फ पप्पू असे अटक करण्यात आलेल्या आरोपी शिक्षकाचे नाव असून, तो बलिया येथील एका प्राथमिक शाळेत कार्यरत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जुलै रोजी आरोपी शिक्षकाने या पीडित विद्यार्थ्याला कोणत्यातरी कामाचे बहाणे करून आपल्या घरी बोलावून घेतले होते. विद्यार्थी घरी पोहोचताच आरोपीने घराचा दरवाजा आतून बंद केला आणि त्याच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या शिक्षकाच्या तावडीतून स्वतःची कशीबशी सुटका करून घेत विद्यार्थ्याने घर गाठले आणि घडलेला सर्व धक्कादायक प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला.

हे ही वाचा : ‘56 टक्के कमिशन’, वर्षभरापूर्वी बांधलेला नांदेडमधील उड्डाणपूल कोसळताच अंबादास दानवेंची पोस्ट

शिक्षण विभागाची त्वरित कारवाई

यानंतर पीडित विद्यार्थ्याने दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आणि सोमवारी (6 जुलै) त्याला अटक केली. या संपूर्ण प्रकरणावर शिक्षण विभागाने सांगितले की, गुरुवारी आरोपी शिक्षकाला निलंबित करण्यात आले असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विभागीय चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. चौकशीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार त्याच्यावर आणखी कडक कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा : मिसिंग लिंक : पहाटे तीनची वेळ, समोर कोसळती दरड अन् SOSचं बटण, तरुणांच्या प्रसंगावधानाची चर्चा

परिसरात संतापाचे वातावरण

या अमानुष घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांकडून नराधम शिक्षकावर कठोर आणि कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की या प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी सुरू असून, घटनास्थळावरून आणि पीडिताकडून उपलब्ध होणाऱ्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयात पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाईल.