Crime News : एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. आईचे असलेले अनैतिक संबंध आणि त्यातून मिळणाऱ्या धमक्यांना कंटाळून एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने तिच्या आजीसोबत विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या दुर्देवी घटनेत उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला असून तिच्या आजीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हरियाणातील कैथल जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
नवरा कामावर गेल्यानंतर...
मिळालेल्या माहितीनुसार, सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या या मुलीच्या वडिलांचा 2012 मध्ये विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आणि 13 वर्षांची मुलगी होती. मुलगी शहरातील सरकारी शाळेत सहावीत शिकत होती. पीडित पित्याने दिलेल्या तक्रारीनुसार, ते कामावर गेल्यानंतर अभिषेक नावाचा स्थानिक तरुण त्यांच्या घरी येत असे आणि त्यांच्या पत्नीसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. या प्रकाराची माहिती 13 वर्षांच्या मुलीला झाली होती. त्यामुळे अभिषेक आणि तिच्या आईने याबद्दल कोणाला सांगितल्यास तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती.
हे ही वाचा : पॉर्न साईटवर टाकले बायकोचे व्हिडीओ, चार वर्षांच्या मुलीसमोरच लज्जास्पद कृत्य; पुढं काय घडलं?
12 ऑगस्टला काय घडलं?
12 ऑगस्ट रोजी पती घरी परतला असता अभिषेक आणि त्याची पत्नी एकत्र आढळले. यावरून वाद होऊन पतीने पत्नीला मारहाण केली, ज्यानंतर ती आपल्या माहेरी निघून गेली. मात्र, यानंतरही आरोपी अभिषेकने मुलीला धमकावणे सुरूच ठेवले. या सततच्या कौटुंबिक कलहाला आणि अभिषेकच्या धमक्यांना कंटाळून 22 ऑगस्ट रोजी दुपारी आजी आणि नातीने हनुमान वाटिका पार्क येथे जाऊन विष प्राशन केले. नागरिकांनी दोघींना तात्काळ सिव्हिल रुग्णालयात दाखल केले, जिथून मुलीला एका रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान 23 ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : 72 तास कुणालच्या कुत्र्यानं घरी काय केलं? आजोबा पोहोचताच धावत आला आणि...
आत्महत्या करण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी
मुलीने आत्महत्येपूर्वी वडिलांच्या नावे एक पानाची चिठ्ठी लिहून ठेवली आहे. "बाबा, अभिषेक आणि मम्मीचे अनैतिक संबंध आहेत. आम्ही आमचे जीवन संपवत आहोत, पण कृपया अभिषेकला सोडू नका, त्याला कडक शिक्षा करा," अशी आर्त हाक तिने या चिठ्ठीतून मारली आहे. या घटनेनंतर मृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अभिषेकविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढीस तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT












