पॉर्न साईटवर टाकले बायकोचे व्हिडीओ, चार वर्षांच्या मुलीसमोरच लज्जास्पद कृत्य; पुढं काय घडलं?

मुंबई तक

• 11:32 AM • 25 Aug 2026

केरळममधील एका 31 वर्षीय व्यक्तीवर आपल्या पत्नीचे खाजगी व्हिडिओ पोर्नोग्राफिक वेबसाइटवर अपलोड केल्याचा आणि आपल्या चार वर्षांच्या मुलीसमोर अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पॉर्न साईटवर टाकले बायकोचे व्हिडीओ

point

चार वर्षांच्या मुलीसमोरच लज्जास्पद कृत्य

point

पुढं काय घडलं?

Crime News : नात्यांना काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पत्नीचे खासगी आणि आक्षेपार्ह व्हिडिओ पॉर्न साईट्सवर अपलोड केल्याप्रकरणी तसेच चार वर्षांच्या चिमुरड्या मुलीसमोर अश्लील चाळे केल्याप्रकरणी 31 वर्षीय पतीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी मूळचा केरळममधील मय्यानाड येथील रहिवासी असून तो गेल्या चार वर्षांपासून पत्नी आणि मुलीसह ब्रिटनमध्ये राहत होता. सुमारे सहा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. ब्रिटनमध्ये असताना पत्नीच्या मित्रांनी तिचे खासगी व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्याची माहिती दिली. त्यानंतर तिने पतीचा मोबाईल तपासला असता, त्यात मुलीच्या उपस्थितीत पतीने केलेले अश्लील कृत्य दिसून आले.

हे वाचलं का?

समुपदेशनानंतरही घडला तोच प्रकार

या प्रकारानंतर हे कुटुंब ब्रिटनवरून केरलमला परतले. परत आल्यानंतर आरोपीचे तीन दिवस समुपदेशन (काउंसलिंग) करण्यात आले, मात्र तरीही त्याच्या वर्तनात कोणताही फरक पडला नाही. आरोप आहे की, समुपदेशनानंतरही त्याने बालिकेचा समावेश असलेला आणखी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. पत्नीने या कृत्याला विरोध दर्शवला असता पतीने तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल करावे लागले. रुग्णालयात उपचार सुरू असताना पोलिसांनी पीडित महिला आणि तिच्या निष्पाप मुलीचा जबाब नोंदवून घेतला अन् आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

हे ही वाचा : रोहित पवारांच्या पीएची मुलगी पार्किंगमध्ये कशी सापडली? सगळी स्टोरी मुंबई Tak वर

वाइफ स्वॅपिंगचा दबाव

तपासादरम्यान पोलिसांनी संबंधित व्हिडिओंची पाहणी केली. या प्रकरणातील अत्याचाराचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीविरोधात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करणाऱ्या 'पॉक्सो' (POCSO) कायद्याअंतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी फरार झाला होता, मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. पीडितेचे वकील प्रशांत व्ही. कुरुप यांनी आरोपीवर पत्नीला 'वाइफ स्वॅपिंग'साठी दबाव टाकल्याचाही गंभीर आरोप केला आहे. तसेच सुरुवातीला पोलिसांनी या तपासात दिरंगाई केली होती, परंतु उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी वेगाने हालचाली करत आरोपीला अटक केली.

हे ही वाचा : Ground Report : जल जीवन मिशनच्या कंत्राटदारांचं पुन्हा आंदोलन, सरकार कधी दखल घेणार?

सायबर सेलच्या मदतीने तपास

सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपीचा मोबाईल फोन आणि इतर पुरावे जप्त करण्यात आले आहेत. हे आक्षेपार्ह व्हिडिओ कुठे आणि कसे अपलोड करण्यात आले, याचा शोध सायबर सेलच्या मदतीने घेतला जात आहे. कौटुंबिक हिंसाचार, व्हिडिओ व्हायरल करणे आणि पोक्सो कायद्यांतर्गत दाखल झालेल्या या गुन्ह्यांमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. न्यायालयीन प्रक्रिया आणि पोलीस तपासाअंती या प्रकरणातील सर्व तथ्यांची अधिकृत पुष्टी होणार आहे.