Crime News : मध्य प्रदेशातील पर्यटन स्थळ असलेल्या पचमढी येथे 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत सामूहिक अत्याचार केला. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून कारवाई करत स्थानिक जिप्सी चालकाला आणि हॉटेलमधील दोन तरुणांना ताब्यात घेतले. दरम्यान, पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. या घटनेनं परिसर हादरून गेला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पालघरच्या आश्रमशाळेत सात वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 26 विद्यार्थांना ताप, खोकला अन् सर्दी
फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने पीडितेवर सामूहिक अत्याचार
पोलिसांच्या माहितीनुसार, 19 ऑगस्ट रोजी दुपारी विद्यार्थिनी तिच्या शाळेतील मैत्रिणीला भेटण्यासाठी बस स्टँडवर गेली होती. तिथे, पीडित आणि मैत्रिणीची भेट हरिओम नावाच्या जिप्सी चालकाशी झाली होती. संबंधित जिप्सी चालकासोबत पवन बन्सल आणि अभिषेक वंशाकर होते. त्या तिन्ही आरोपींनी पीडित आणि तिच्या मैत्रिणीला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने साऊथ स्काऊट गाईड्सजवळील एका जंगलात नेले होते, त्याच ठिकाणी पीडितेला जिप्सीला बांधून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता.
पीडितेनं सांगितला घटनेचा घटनाक्रम
दरम्यान, तिन्ही आरोपींनी विद्यार्थिनी आणि तिच्या मैत्रिणीला, जर कोणाला काहीही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. घरी परतल्यानंतर, भयभीत झालेल्या पीडितेला शाळेत जाण्यावरून बंदी घालण्यात आली. मोठ्या बहिणीने तिला विचारले असता, तिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली.
हे ही वाचा : Astrology : ग्रहस्थितीत मोठा बदल, 2 सप्टेंबरपर्यंत 'या' राशींनी सावध राहावे
अशातच पोलिसांनी पंचमढी येथील पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेतला होता. पोलिसांनी तिन्ही आरोपी नराधमांविरोधात भारतीय दंड संहिता अंतर्गत पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर आरोपीला अटक देखील करण्यात आली होती.
ADVERTISEMENT












