38 वर्षीय प्रेयसीच्या नादाला लागला, लग्नानंतर तिसऱ्याच महिन्यात बायकोसोबत केलं नको तेच

मुंबई तक

09 Jul 2026 (अपडेटेड: 09 Jul 2026, 12:57 PM)

38 वर्षीय प्रेयसीसाठी एका नवऱ्याने आपल्या 22 वर्षीय निष्पाप बायकोची हत्या केली आहे. हरियाणातील गुरुग्राममधील ही घटना असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

38 वर्षीय प्रेयसीच्या नादाला लागला

point

लग्नानंतर तिसऱ्याच महिन्यात बायकोसोबत केलं नको तेच

Crime News : एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. नवऱ्याने त्याच्या प्रेयसीसोबत मिळून 22 वर्षीय बायकोची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. आपल्या तीन वर्षांच्या जुन्या प्रेमसंबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याच्या रागातून पतीने लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच हे टोकाचे पाऊल उचलले. हत्येचा हा कट रचून दोघेही पोलिसांना गुंगारा देत नेपाळला पळून गेले होते. मात्र, भारतात परतताच पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे या दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. हरियाणातील गुरुग्राममधील ही घटना आहे.

हे वाचलं का?

38 वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबंध

या थरारक प्रकरणाची पार्श्वभूमी तीन वर्षांपूर्वीची आहे. मानेसर येथील रहिवासी असलेला 25 वर्षीय अंकित याचे 38 वर्षीय रजनीसोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. रजनी ही एका भाड्याच्या खोलीत राहत होती. दरम्यान, फेब्रुवारी 2026 मध्ये अंकितचा विवाह 22 वर्षीय तरुणीशी झाला. मात्र, लग्नानंतरही अंकित आणि रजनीचे अनैतिक संबंध सुरूच होते. अखेर, पत्नीला आपल्या प्रेमाच्या रस्त्यातून कायमचे हटवण्यासाठी अंकित आणि रजनीने तिच्या हत्येचा एक सुनियोजित कट रचला. यासाठी अंकितने दोन महिन्यांपूर्वीच उत्तर प्रदेशातून एक बेकायदेशीर हत्यार देखील आणून ठेवले होते.

हे ही वाचा : मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रिमचा परवाना रद्द, तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर मोठी कारवाई

22 वर्षीय निष्पाप पत्नीची हत्या

ठरलेल्या योजनेनुसार, 21 मे रोजी अंकित आपल्या पत्नीला मनवण्याच्या बहाण्याने रजनीच्या भाड्याच्या खोलीवर घेऊन गेला. तिथे अंकित आणि रजनी या दोघांनी मिळून त्या 22 वर्षीय निष्पाप पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. हत्येनंतर घरातून पळ काढून आरोपी प्रथम हरिद्वारला गेले आणि तिथून त्यांनी थेट नेपाळ गाठले. दुसरीकडे, 21 मे रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच मुलीच्या माहेरच्यांनी तिचा शोध सुरू केला. सासरच्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने 22 मे रोजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्याच दिवशी पोलिसांनी मानेसरमधील खोलीतून विवाहितेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जप्त केला.

हे ही वाचा : विवाहित प्रेयसीच्या प्रेमात वेडा झाला, सोन्यासारख्या बायकोसमोरच भयानक कांड

नेपाळहून परतले अन् अडकले

गुन्ह्याचा माग काढत पोलिसांनी तपास सुरू केला असता, संशयाची सुई पती अंकितकडे गेली. दोघेही आरोपी महिनाभरापेक्षा जास्त काळ नेपाळमध्ये लपून बसले होते. अखेर 30 जून रोजी ते भारतात परतले आणि मानेसरला पोहोचताच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. न्यायालयाने या क्रूर प्रेमी युगुलाला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, पोलीस आता हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त करण्यासह या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.