आठवीच्या विद्यार्थ्यानीवर चोरीचा संशय, शिक्षकांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे घडलं भयानक

मुंबई तक

• 12:21 PM • 10 Jul 2026

आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांनी चोरीचा खोटा आरोप केला. ही गोष्ट त्या विद्यार्थिनीला सहन झाली नाही. अखेर तिने टोकाचे पाऊल उचलले. बेंगलोरमधील ही घटना आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आठवीच्या विद्यार्थ्यानीवर चोरीचा संशय

point

शिक्षकांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे घडलं भयानक

Crime News : एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका शासकीय प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या इयत्ता आठवीतील विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. शाळेत आपल्यावर पैशांची चोरी केल्याचा खोटा आरोप करण्यात आला आणि त्यामुळे झालेल्या अपमानाचा प्रचंड मानसिक त्रास सहन न झाल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचे तिने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत (सुसाईड नोट) म्हटले आहे. ही घटना गुरुवारी रात्री तिच्या राहत्या घरी घडली असून, शुक्रवारी सकाळी कुटुंबीयांच्या लक्षात आली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. कर्नाटकच्या बेंगलोर जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

चोरीचा खोटा आरोप आणि अपमानास्पद वागणूक

पोलीस तपासात मिळालेल्या सुसाईड नोटनुसार, सदर विद्यार्थिनीवर शाळेत 20 आणि 10 रुपये चोरी केल्याचा खोटा आरोप करण्यात आला होता, ज्यामुळे ती प्रचंड दुखावली गेली होती. शाळेतील शिक्षकांनी तिला यावरून खूप ओरडले आणि अपमानास्पद वागणूक दिली, जी ती सहन करू शकली नाही. या मानसिक छळामुळे आता आपल्याला जगण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी भावना तिने चिठ्ठीत व्यक्त केली आहे. तिने आपल्या आई, भावंडे आणि इतर कुटुंबीयांची वारंवार माफी मागितली असून, या मृत्यूसाठी तिच्या आईला जबाबदार धरू नये आणि हा निर्णय तिने स्वतःच्या इच्छेने घेतला असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे.

हे ही वाचा : मिसिंग लिंक : पहाटे तीनची वेळ, समोर कोसळती दरड अन् SOSचं बटण, तरुणांच्या प्रसंगावधानाची चर्चा

तो शिक्षक कोण?

दुसरीकडे, मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, शाळेतील शिक्षकांच्या सततच्या जाचामुळे आणि ओरडण्यामुळेच त्यांच्या मुलीने हे टोकाचे पाऊल उचलले. मुलीच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, घरात तिच्यावर कोणताही दबाव किंवा त्रास नव्हता. तिला फक्त इतकेच समजले होते की, शाळेत शिक्षकांकडून तिच्या मुलीला त्रास दिला जात होता, मात्र नेमक्या कोणत्या शिक्षकाने हे केले, याबाबत तिला सविस्तर माहिती नाही.

हे ही वाचा : आईने प्रियकरासोबत केला कायदेशीर करार, मुलाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

सुसाईड नोटची सत्यता

घटनेच्या वेळी मुलीची आई त्वचेच्या आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल होती आणि नातेवाईकांनी फोनवरून माहिती दिल्यानंतर तिला या घटनेची माहिती मिळाली. पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या हाताने लिहिलेल्या सुसाईड नोटची सत्यता पडताळून पाहिली जात आहे. तसेच, शाळेत शिक्षकांनी तिला खरंच ओरडले होते का आणि कोणत्या परिस्थितीमुळे तिने आत्महत्या केली, या संदर्भात कुटुंबीयांच्या आरोपांचा आधार घेऊन पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.