सरकारी कर्मचाऱ्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार, नात्यानं निघाला काका

मुंबई तक

• 07:00 AM • 10 Jul 2026

Crime News : एका तरुणीने आपल्याच नातेवाईकावर ब्लॅकमेलिंग आणि लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. संबंधित प्रकरणात आरोपीनं सरकारी नोकरीचे आमिष दाखवून पीडितेवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला. या संपूर्ण घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

crime news sexual assault

crime news sexual assault

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पीडितेवर लैंगिक छळ करणारा नात्याने काका निघाला

point

पीडितेनं केला आत्महत्येचा प्रयत्न

Crime News : राजस्थानातील चित्तोडगढ जिल्ह्यातील रावतभाटा ठाणे क्षेत्रात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणीने आपल्याच नातेवाईकावर ब्लॅकमेलिंग आणि लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. संबंधित प्रकरणात आरोपीनं सरकारी नोकरीचे आमिष दाखवून पीडितेवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला. या संपूर्ण घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुण्याची गोष्ट: पावसामुळे कर्मचाऱ्याने रजा मागितली, मॅनेजरनं थेट नाकारली; स्क्रीनशॉट व्हायरल

लैंगिक छळ करणारा नात्याने काका निघाला

घडलेल्या घटनेनुसार, पीडिता ही रावतभाटा येथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी पीडितेच्या घरी कोणीही नव्हतं हे पाहून, आरोपी त्याच्या घरी पोहोचला. आरोपी हा नातेसंबंधातून पीडितेचा काका लागत होता, अशी माहिती माध्यमांनी दिली. त्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले, पीडितेनं विरोध केला असता, धमकी दिली. 

तरुणीला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

पीडितेनं सांगितलं की, आरोपीने तिला घाबरवण्यासाठी आपल्या सरकारी नोकरीचा देखील गैरवापर केला. आरोपी म्हणाला की, तिची समाजात बदनामी करेन, तो इथवरच न थांबता आरोपीने तरुणीला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. पीडितेच्या माहितीनुसार, आरोपीने वेगवेगळ्या मोबाइल फोनवरून अश्लील बोलून मानसिकदृष्ट्या छळ केला.

हे ही वाचा : लातूर: ड्रायव्हर फोनवर बोलत होता, शाळेची बस पलटी होऊन अपघातात 23 विद्यार्थी जखमी

आत्महत्येचा प्रयत्न

सतत मिळणाऱ्या धमकीने आणि मानसिक दबावाने पीडिता खचून गेली होती. तिने राणा प्रताप सागर धरणावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी काही जवानांनी तिला वाचवले. महिला भयभीत झाल्याने तिने तक्रार केली नाही. मात्र तिने पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखवले. या प्रकरणात तपास सहायक उपनिरीक्षक त्रिभुवन सिंग यांच्याकडे हे प्रकरण सोपवण्यात आले. या प्रकरणाची पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.