Crime News : एका तरुणाने आपल्या आईसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येचा थरार परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांतच मुख्य आरोपीला अटक केली आहे. कौटुंबिक आणि जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गुजरातच्या राजकोटमधील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
रोजंदारीवर काम अन् लिव्ह इन रिलेशन
कमलेश वाघेला (35) असे मृत व्यक्तीचे नाव असून, तो जेतपूर नगरपालिकेत रोजंदारीवर मजूर म्हणून काम करत होता. मंगळवारी (7 जुलै) दुपारी जेतपूर शहरातील कनकिया प्लॉट भागात ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी जयंत वाघेला या तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कमलेशचा भाऊ कपिल वाघेला (25) याचा जबाब नोंदवून घेण्यात आला असून त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अंक सुरू? पहिल्यांदाच शरद पवारांवर संजय राऊत नाराज!
लिव्ह-इन रिलेशनशिपचा करार
कपिलने दिलेल्या माहितीनुसार, कमलेश आणि जयंतची आई नीता हे दोघे गेल्या 12 वर्षांपासून एकत्र राहत होते. त्यांनी कायदेशीररीत्या लिव्ह-इन रिलेशनशिप करार देखील केला होता. नीताचा पहिला पती काळू वाघेला हा हयात असतानाच तिचे कमलेशसोबतचे संबंध सुरू झाले होते, ज्याचा राग जयंतच्या मनात होता. नीताला तिच्या पहिल्या पतीपासून दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. त्यापैकी मुलीला कमलेशने दत्तक घेतले होते, मात्र नीताचा तिच्या मुलांशी कोणताही संपर्क नव्हता. याच जुन्या रागातून आणि द्वेषातून जयंतने कमलेशवर हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा : आदित्य ठाकरे विधानसभेत चवताळून उठले.. पण तिथं आधी आणि नंतर घडलं तरी काय?, सगळंच प्रचंड इंटरेस्टिंग!
पाचपेक्षा जास्त वार करुन हत्या
पोलिसांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवाल आणि प्राथमिक तपासानुसार कमलेशवर पाचपेक्षा जास्त वेळा चाकूने वार करण्यात आले होते. घटनास्थळावरून मिळालेल्या ऑडिओसह सीसीटीव्ही फुटेजची पोलीस सखोल तपासणी करत आहेत. या फुटेजमध्ये कमलेश स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आजूबाजूच्या लोकांकडे आणि आरोपीकडे गयावया करताना दिसत आहे. या हल्ल्याच्या वेळी आरोपी जयंतसोबत आणखी एक व्यक्ती तिथे उपस्थित असलेली फुटेजमध्ये दिसत असून, पोलीस आता तिची ओळख पटवण्याचा आणि या गुन्ह्यातील तिच्या भूमिकेचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT












