अफेअर सुरु असताना लग्न केलं, इंजिनिअरकडून लग्नाच्या 4 महिन्यानंतर पत्नीची हत्या

मुंबई तक

10 Jul 2026 (अपडेटेड: 10 Jul 2026, 10:21 AM)

अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये 27 वर्षीय महिलेच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण हत्या असल्याचे समोर आले आहे. पत्नीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी तिच्या पतीला अमेरिकन पोलिसांनी अटक केली आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

अफेअर सुरु असताना लग्न केलं,

point

इंजिनिअरकडून लग्नाच्या 4 महिन्यानंतर पत्नीची हत्या

Crime News : अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील बेलव्ह्यू येथील 27 वर्षीय राजिता सब्बिनेनी हिच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगितले जात होते. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर हे प्रकरण कथित हत्येचे असल्याचे समोर आले. या प्रकरणात तेलंगणातील 30 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर अविनाश नार्ने याला पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याच्या आरोपाखाली अमेरिकन अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. अविनाश आणि राजिता यांचा विवाह 5 जून 2025 रोजी झाला होता. विवाहानंतर राजिता टेक्सासमधून सिएटल परिसरात वैवाहिक आयुष्य सुरू करण्यासाठी आली होती. मात्र लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांतच तिचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण आता गंभीर स्वरूपाचे बनले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Personal Finance: दरमहा 2 हजार गुंतवा आणि 42 हजार परत मिळवा, लखपती बनण्याचा फॉर्म्युला!

30 मिनिटे सीपीआर देण्याचा प्रयत्न

तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर 2025 रोजी अविनाशने 911 वर फोन करून आपण बाहेरून घरी परतलो असता पत्नी बाथरूममध्ये प्रतिसाद देत नसल्याचे सांगितले होते. त्याने पत्नीने चुकून स्वतःला बाथरूममध्ये बंद करून घेतल्याचा दावा केला होता. त्यानंतर पोलिस आणि आपत्कालीन पथकाने बाथरूमचे दार तोडून आत प्रवेश केला आणि राजितावर सुमारे 30 मिनिटे सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला मृत घोषित करण्यात आले. सुरुवातीला समुदायातील स्वयंसेवकांनाही राजिता सकाळपासून अस्वस्थ होती, तिने आई-वडिलांशी आणि पतीशी संवाद साधला होता तसेच बाहेरून औषध आणि अन्न मागवण्याची इच्छा व्यक्त केली होती, अशीच माहिती देण्यात आली होती.

हेही वाचा : आदित्य ठाकरे विधानसभेत चवताळून उठले.. पण तिथं आधी आणि नंतर घडलं तरी काय?, सगळंच प्रचंड इंटरेस्टिंग!

हत्येनंतर पत्नीच्या डेडबॉडीचा फोटो गर्लफ्रेंडला पाठवला 

मात्र शवविच्छेदन अहवालात राजिताचा मृत्यू गळा आवळल्यामुळे श्वास रोखला गेल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आणि तपासाची दिशा पूर्णपणे बदलली. तपासादरम्यान अविनाशचे भारतातील एका महिलेशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राजिताच्या मृत्यूच्या दिवशी त्याने त्या महिलेशी अनेक वेळा फोनवर संपर्क साधला होता. तसेच कथित हत्येनंतर राजिताच्या मृतदेहाचा फोटोही त्या महिलेला पाठविल्याचा आरोप आहे. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, विवाहानंतरही अविनाश आणि संबंधित महिला संपर्कात होते. राजिताच्या मृत्यूच्या दिवशी त्याने त्या महिलेला किमान चार वेळा फोन केला होता. तपासादरम्यान हटवण्यात आलेल्या संदेशांबाबत विचारणा केल्यावर राजिताच्या मृतदेहाचा फोटो पाठवल्याची कबुली त्याने दिल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे.

तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. मृत्यूच्या दिवशी पतीने तयार करून दिलेल्या स्मूदीची चव "कफ सिरपसारखी कडू" असल्याचा संदेश राजिताने अविनाशलाच पाठविला होता. या सर्व बाबींच्या आधारे अमेरिकन पोलिसांनी अविनाशला मुख्य संशयित मानले. दरम्यान, राजिताच्या अंत्यसंस्कारासाठी मदत करणाऱ्या तेलुगू समुदायातील स्वयंसेवकांनी सांगितले की, सुरुवातीला अविनाश आणि त्याच्या एका मित्राने अंत्यविधीसाठी मदत मागितली होती. त्यावेळी हे हत्या प्रकरण असल्याचा किंवा अविनाश स्वतः संशयित असल्याचा कोणताही संकेत नव्हता. नंतर पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या आरोपांमुळे सर्वांनाच धक्का बसला. राजिताच्या नातेवाईकांनी अमेरिकेतील तेलुगू संघटनांशी संपर्क साधल्यानंतर स्थानिक स्वयंसेवकांनी मदत केली असून तिच्यावर वॉशिंग्टनमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.