POCSO प्रकरणातील आरोपीकडून 6 जणांची हत्या, क्रूर मानसिकतेने कळस गाठला

मुंबई तक

• 09:48 AM • 11 Jul 2026

hyderabad crime news : POCSO प्रकरणातील 35 वर्षीय आरोपीने हैदराबादजवळ एका रात्रीत सहा जणांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्याने स्वतःची पत्नी आणि दोन लहान मुलांचाही जीव घेतल्याचा आरोप आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

POCSO प्रकरणातील आरोपीकडून 6 जणांची हत्या

point

क्रूर मानसिकतेने कळस गाठला

hyderabad crime news : 35 वर्षीय शेतकऱ्याने हैदराबादजवळील रंगा रेड्डी जिल्ह्यात एका रात्रीत सात जणांच्या हत्येचा थरार घडवल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री समोर आली. या आरोपीने प्रथम POCSO प्रकरणातील 16 वर्षीय पीडित मुलगी, तिची आई आणि आजी यांची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर स्वतःच्या घरी जाऊन पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांचाही गळा चिरून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम सुरू केली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'Mr Judicial Servant, I Order You…'; सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील न्यायमूर्तींसमोर गोंधळ, पेपर भिरकावत शिवीगाळही

पीडितेच्या घरी जाऊन अनेकांना संपवलं 

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीविरोधात मे महिन्यात 16 वर्षीय मुलीचा पाठलाग केल्याप्रकरणी POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी रात्री सुमारे 10.45 वाजता तो आपल्या गावातून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शाबाद शहरात मुलीच्या घरी पोहोचला. दरवाजा उघडताच त्याने 42 वर्षीय आईवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यानंतर घरात प्रवेश करून झोपलेल्या 60 वर्षीय आजीची हत्या केली. यानंतर त्याने अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तेथून नेले. मात्र, त्यावेळी घरात असलेल्या मुलीच्या 20 वर्षीय मानसिकदृष्ट्या दिव्यांग बहिणीला त्याने कोणतीही इजा केली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा : 'भाडे टट्टू मागे घेतो... पण सुपारीबाज म्हणतो, मिमिक्री आर्टिस्ट...' फडणवीसांनी एवढं का दाखवलं बोलून?

पत्नी आणि दोन मुलांचाही केला खून 

यानंतर आरोपी आपल्या गावाजवळील तलाव परिसरात गेला. तेथे त्याने अल्पवयीन मुलीची चाकूने हत्या करून तिचा मृतदेह तलावाच्या बंधाऱ्याजवळ टाकल्याचा आरोप आहे. त्यानंतर रात्री 11.21 वाजता तो स्वतःच्या घरी पोहोचला. अवघ्या सहा मिनिटांत त्याने झोपलेल्या 31 वर्षीय पत्नी तसेच चार वर्षांचा आणि 18 महिन्यांचा अशा दोन मुलांचा गळा चिरून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व हत्याकांड केल्यानंतर आरोपीने शाबादमध्ये राहणाऱ्या आपल्या वडिलांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला आणि त्यानंतर कार घेऊन तेथून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी सांगितले की, POCSO गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. जून महिन्यात त्याने शाबादमधील स्थानिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. संबंधित गुन्ह्यात कमाल सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्याने न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याची वैयक्तिक हमीवर सुटका करण्यात आली होती. सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या हत्याकांडामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.