घरात डोकावून पाहिल्याचा राग, क्षणात घेतला जीव; पाचगणीतील थरारक खुनाचा उलगडा

मुंबई तक

• 10:26 AM • 11 Jul 2026

Satara Crime News : घरात डोकावून पाहिल्याचा राग... आणि क्षणात घेतला जीव! पाचगणीतील थरारक खुनाचा 24 तासांत उलगडा

Satara Crime News

Satara Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

घरात डोकावून पाहिल्याचा राग, क्षणात घेतला जीव

point

पाचगणीतील थरारक खुनाचा उलगडा

Satara Crime News : सातारा जिल्ह्यातील पाचगणी परिसरातील भोसे गावात एका क्षुल्लक कारणातून घडलेल्या खुनाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. घरात डोकावून पाहिल्याचा संशय मनात धरून चौघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या 24 तासांत छडा लावत पाचगणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून वेगवान तपासाची चुणूक दाखवली. ही घटना 8 जुलैच्या रात्री घडली. 

हे वाचलं का?

हेही वाचा : 'Mr Judicial Servant, I Order You…'; सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील न्यायमूर्तींसमोर गोंधळ, पेपर भिरकावत शिवीगाळही

घरात डोकावून पाहिल्याचा राग, तरुणाला बेदम मारहाण

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील अक्षय रमेश जाधव हा आपल्या मित्रांसह महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आला होता. रात्रीच्या वेळी मित्रांसोबत मद्यपान झाल्यानंतर अक्षयची प्रकृती बिघडू लागल्याने मित्रांनी त्याला खोलीत ठेवून बाहेरून कडी लावली आणि ते वरच्या मजल्यावर गेले. काही वेळाने अक्षय खोलीबाहेर कसा आला, याबाबत नेमकी माहिती नसली तरी तो जवळच असलेल्या एका घराजवळ गेला. पोलिसांच्या तपासानुसार, त्या घरात डोकावून पाहिल्याचा राग घरातील व्यक्तींनी मनात धरला. याच किरकोळ कारणाचे रूपांतर काही क्षणांत रक्तरंजित हल्ल्यात झाले.

उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू 

सूर्यकांत चंद्रकांत गोळे, अविनाश सतीश भोसले, राहुल जनार्दन राजपुरे आणि अमोल गेणदेव वाडकर या चौघांनी अक्षयला अडवून हाताने, लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण केली. या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला. मित्रांनी त्याला तातडीने पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी पुण्यातील डॉ. बोके रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर मृताचा मित्र विशाल अजित जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचगणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) आणि 2(5) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत चारही आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुमारे सात तासांत आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने चारही आरोपींना 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.