घरात घुसून एक्स गर्लफ्रेंडवर वार, नंतर स्वत:चा चिरला गळा, ड्रायव्हर का झाला क्रूर?

मुंबई तक

• 03:32 PM • 10 Jul 2026

एक्स बॉयफ्रेंडने एका तरुणीवर घरात घुसून चाकूने सपासप वार केले. त्यानंतर त्याने स्वत:चही गळा चिरला. बेंगलोरमधील या आरोपीने हा हल्ला का केला, जाणून घेऊया.

Crime news

Crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

घरात घुसून एक्स गर्लफ्रेंडवर वार

point

नंतर स्वत:चा चिरला गळा

point

ड्रायव्हर का झाला क्रूर?

Crime news : एका 18 वर्षीय तरुणीवर तिच्या एक्स बॉयफ्रेंडने घरात घुसून चाकूने वार केले. 9 जुलै रोजी ही घटना घडली. या भीषण हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःचाही गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बंदे नवाज याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

हे वाचलं का?

तीन वर्षांपासून रिलेशनमध्ये

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी बंदे नवाज हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. त्यांनी एका खाजगी शाळेत एकत्र शिक्षण घेतले होते आणि ते आधी रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, तरुणीच्या पालकांनी तिचे लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत ठरवल्यानंतर तिने नवाजचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता. याच रागातून आणि लग्नाला नकार दिल्यामुळे नवाजने तिच्यावर हा जीवघेणा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 

हे ही वाचा : वर्गमित्राकडून अनन्वित छळ करुन हत्या, मेडिकलच्या विद्यार्थीनीसोबत काय घडलं?

गळा, हात, बरगड्यांवर सपासप वार

गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी तरुणीचे आई-वडील घरात नव्हते, हीच संधी साधून नवाज तिच्या घरात घुसला. त्याने सर्वात आधी तरुणीच्या दोन लहान भावांना एका खोलीत कोंडले आणि त्यानंतर तरुणीवर चाकूने सपासप वार केले. त्याने तिच्या गळ्यावर, हातांवर, तळहातावर, बरगड्यांवर आणि मांड्यांवर अनेक गंभीर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली असतानाही, तरुणीने हिंमत दाखवून घरातून बाहेर पळ काढला आणि मदतीसाठी आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. कर्नाटकातील बेंगलोरमधील ही घटना आहे.

हे ही वाचा : 'घरी ये, काम आहे...' 14 वर्षीय विद्यार्थ्यावर शिक्षकाने केला लैंगिक अत्याचार

हल्ल्यानंतर स्वत:चही चिरला गळा

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. हल्ल्यानंतर नवाजने स्वतःचाही गळा कापून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. आरोपी बंदे नवाज हा चालक म्हणून काम करतो. सध्या पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, तर आरोपीवरदेखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.