Crime News : ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यातील ब्रह्मपुरमध्ये मन हेलावून टाकणारा प्रकार उघडकीस आला. बापाने मुलीचं लैंगिक शोषण केलं, नंतर तिला दुसऱ्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. हे पाहून पीडितेनं स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतलं. या घटनेनं वडील आणि लेकराच्या नात्याला काळिमा फासणारी घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बाईक चोरीचा संशय, तरुणाला विजेचा शॉक; Video व्हायरल
वडिलांचा मुलीवर सातत्याने लैंगिक अत्याचाराचा आरोप
पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणीने जबाबात सांगितलं की वडील हे तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार करत आहे. एवढंच नसून दूसऱ्या लोकांसोबत शरीसंबंध ठेवण्यास दबाव देखील आणला होता. पीडितेनं आरोप करत सांगितलं, या पूर्ण प्रकरणात विरोध केला असता, वडिलांनी तिचा मानसिक छळ केला.
या प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक आलोक जेना यांनी घटनेला दुजोरा दिला होता. त्यांनी सांगितलं की, पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान, मुलीच्या आणि तिच्या वडिलांचे चॅट्स, मोबाईल फोन आणि इतर पुरावे जप्त केले. या पुराव्यांच्या आधारे आरोपी वडिलांना अटक देखील करण्यात आली. एएसपी आलोक जेना यांनी सांगितलं की, तपासातून इतर अनेक व्यक्तींची नावे समोर आलेली आहेत. त्यांचा देखील तपास करण्यात येत आहे.
तिने स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं
पोलीस तपासातून उघड झाले की, आरोपी बापाने आपल्या मुलीची शैक्षणिक प्रमाणपत्रे ही स्वत:कडे ठेवली होती. आरोपी बापानेच तिच्यावर वाईट कृत्य केल्याचा आरोप आहे. या आरोपांमुळे वैवाहिक जीवनात मोठा वाद निर्माण झाला, ती सासरच्या मंडळींपासून विभक्त झाली. 9 जुलैच्या सकाळी. ती महिला तिच्या सासरी परतली. तिने स्वत:ला घराच्या छतावर कोंडून घेतले आणि पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतलं.
अशा स्थितीत तिच्या काकाने तिला पाहिले आणि तिला वाचवले. तिला उपचारासाठी ब्रह्मपूर येथील एमकेसीजी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर तिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला भुवनेश्वर येथील सॅम रुग्णालयात हलविले होते.
हे ही वाचा : Astrology : जुलै महिन्याच्या शेवटी मोठे फेरबदल, 'या' राशींचे भाग्य उजळणार
अश्लील फोटो दाखवून ब्लॅकमेल
दरम्यान, पोलिसांनी आरोपीचे दोन मोबाईल फोन आणि पीडितेचा मोबाईल फोन तपासण्यासाठी घेतला होता. तपासातून असे उघडकीस आले की, आरोपीने लग्नापूर्वी पीडितेच्या सासऱ्यांकडून 10 लाख रुपये घेतले होते. जेव्हा पीडितेनं पैसे परत करण्याची मागणी केली, तेव्हा आरोपीने तिचे अश्लील फोटो दाखवत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी असा संशय व्यक्त केला की, आरोपीच्या सततच्या लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि मानिसक छळामुळे आत्मदहन करत टोकाचं पाऊल उचललं.
ADVERTISEMENT












