पाणी समजून तरुणीनं घेतला ॲसिडचा घोट, प्रकरण गंभीर

मुंबई तक

11 Jul 2026 (अपडेटेड: 11 Jul 2026, 04:52 PM)

CrIme News : एका युवतीने दुकानदारकडून खरेदी केलेल्या पाण्याच्या बाटलीत ॲसिड असल्याचा आरोप केला होता. महिला शिक्षिकेनं पाणी समजून ॲसिड प्यायलं. अशातच तिची प्रकृती नाजूक होती, तिथल्या डॉक्टरांनी तरुणीला दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यास सांगितलं.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

दुकानदाराकडून महिला शिक्षिकेनं बाटली घेतल्याचा सीसीटीव्ही

point

बाटलीत पाण्याऐवजी ॲसिड

CrIme News : उत्तर प्रदेशातील हापुड येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका युवतीने दुकानदारकडून खरेदी केलेल्या पाण्याच्या बाटलीत ॲसिड असल्याचा आरोप केला होता. महिला शिक्षिकेनं पाणी समजून अॅसिड प्यायलं. अशातच तिची प्रकृती नाजूक होती, तरुणीला मेरठ येथील हायर सेंटरमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबई: टिव्ही अभिनेत्याला अटक, 16 वर्षीय मुलीचा छळ केल्याचा आरोप

दुकानदाराकडून महिला शिक्षिकेनं बाटली घेतल्याचा सीसीटीव्ही

दुकानदाराकडून महिला शिक्षिकेनं बाटली घेतल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला होता, तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हे प्रकरण हापूड येथील कोतवाली क्षेत्रातील मोहल्ला अर्जुननगर येथील एका दुकानातील आहे. 

बाटलीत पाण्याऐवजी ॲसिड

माहितीनुसार, महिला शिक्षिकेनं पाण्याची मागणी केली असता, तिला पाण्याची बॉटल देण्यात आली. मात्र, बाटलीत पाण्याऐवजी ॲसिड भरलेलं होतं. महिलेनं जसा पाण्याचा घोट घेतला, त्यानंतर तिची प्रकृती अचानकपणे बिघडली. 

हे ही वाचा : मुंबईत मुलीला डोंगरावरून ढकलून दिलं, लोहगड प्रकरणाची पुनरावृत्ती

संबंधित घटनेनंतर नातेवाईकांसह आसपासच्या नागरिकांनी तिला तात्काळपणे रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर तिची गंभीर परिस्थिती पाहून मेरठच्या हायर सेंटर येथे रेफर करण्यात आलं. या घटनेची सूचना मिळताच, हापुडनगर कोतवाली पोलीस चौकीत पोहोचली आणि या प्रकरणाचा तपास करण्यात आला. सुरूवातीला अशी माहितीचा तपास करण्यात आला की, बाटलीत ॲसिड नेमकं कसं आलं? याला नेमकं कोण जबाबदार आहे? कोणाचा निष्काळजीपणा आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय.