मटनाची आस लावून बसले, पण वाढलं चिकन, भर लग्न मंडपात तुफान हाणामारी

मुंबई तक

11 Jul 2026 (अपडेटेड: 11 Jul 2026, 03:33 PM)

Crime News : बिहारमधील सहरसा येथे विवाह पार पडल्यानंतर मेजवानीत मटणाऐवजी चिकन वाढल्याचा आरोप करत वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून वरपक्षातील सातहून अधिक जण जखमी झाले आहेत.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मटनाची आस लावून बसले, पण वाढलं चिकन

point

भर लग्न मंडपात तुफान हाणामारी

Crime News : विवाहाचे सर्व धार्मिक विधी शांततेत पार पडले होते. वधू-वर विवाहबंधनात अडकले होते आणि उपस्थित पाहुणे मेजवानीसाठी पंगतीकडे वळले होते. मात्र, जेवणाच्या मेन्यूवरून अचानक वाद निर्माण झाला आणि आनंदाचे वातावरण काही क्षणांतच तणावपूर्ण बनले. ही घटना बिहारमधील सहरसा जिल्ह्यात घडली. सिमरी बख्तियारपूर येथील युवकाची वरात महिषी प्रखंडातील राजनपूर गावात पोहोचली होती. गुरुवारी दुपारी सुमारे तीन वाजता विवाह संपन्न झाला आणि त्यानंतर पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली.

हे वाचलं का?

हेही वाचा : जामीनावर सुटताच रक्तरंजीत कांड, पत्नी अन् पोरा-बाळांसह 6 जणांची हत्या

मटणाऐवजी चिकन वाढण्यात आल्याने वऱ्हाड संतापले 

वरपक्षाचा आरोप आहे की, विवाहापूर्वी मेजवानीत मटणाचा बेत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली होती. मात्र, जेवण्यासाठी बसल्यानंतर त्यांच्या ताटात मटणाऐवजी चिकन वाढण्यात आले. यावर काही वऱ्हाडी मंडळींनी आक्षेप घेतला. सुरुवातीला झालेली शाब्दिक चर्चा काही वेळातच तीव्र वादात बदलली. दोन्ही बाजूंनी आवाज चढू लागले आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. काही वेळापूर्वी एकमेकांना शुभेच्छा देणारे लोक एकमेकांसमोर उभे ठाकले.

हेही वाचा : घरात डोकावून पाहिल्याचा राग, क्षणात घेतला जीव; पाचगणीतील थरारक खुनाचा उलगडा

जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावाधाव 

वाद वाढताच दोन्ही पक्षांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. लाठी-काठ्यांनी मारहाण झाल्याने विवाहस्थळी एकच गोंधळ उडाला. पंडालमध्ये उपस्थित लोक जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावू लागले. या झटापटीत वरपक्षातील सातहून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. सर्व जखमींना सिमरी बख्तियारपूर येथील अनुमंडलीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जखमी झालेल्या वराच्या काकांनी आरोप केला की, जेवणाबाबत प्रश्न विचारल्यानंतर वधूपक्षातील लोकांनी अचानक हल्ला केला. मात्र, या प्रकरणावर वधूपक्षाची सविस्तर भूमिका अद्याप समोर आलेली नाही. या संपूर्ण घटनेचे काही व्हिडिओही समोर आले असून त्यामध्ये विवाहसोहळ्याचे वातावरण अचानक हिंसक झाल्याचे दिसत आहे. काही जण पळताना, तर काही जण लाठ्या घेऊन धावताना दिसत आहेत. सध्या दोन्ही पक्षांमध्ये तणाव कायम असून वरपक्षाने पोलिसांकडे तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.