'पूजा करा, तुमच्या मुलाला नोकरी लागेल...' नागपुरातील भोंदू बाबाचा महिलेवर बलात्कार

मुंबई तक

12 Jul 2026 (अपडेटेड: 12 Jul 2026, 09:47 AM)

नागपूरमध्ये स्वतःला चमत्कारी बाबा म्हणवणाऱ्या एका भोंदूने महिलेवर बलात्कार केला आहे. त्याने पीडितेच्या मुलाला नोकरी मिळवून देण्याचे आणि विशेष पूजा करण्याचे आमिष दाखवून तिला फसवले होते.

Nagpur Crime

Nagpur Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'पूजा करा, तुमच्या मुलाला नोकरी लागेल...'

point

नागपुरातील तांत्रिकाने महिलेवर केला बलात्कार

Nagpur Crime : नागपूरमधून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे स्वतःला 'चमत्कारी बाबा' म्हणवून घेणाऱ्या संजय शिरोडे नावाच्या भोंदू बाबाला एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेच्या कुटुंबाला त्यांच्या 21 वर्षीय मुलाला माथाडी (हमाल) कामगार म्हणून नोकरी लावून देण्याचे खोटे आमिष दाखवले होते आणि याद्वारेच त्याने या कुटुंबाचा विश्वास संपादन केला होता. 

हे वाचलं का?

मुलाच्या नोकरीसाठी...

पीडित महिला आणि तिच्या पतीची 16 जून रोजी संजय शिरोडे याच्याशी भेट झाली होती. त्यावेळी आरोपीने आपल्या भोंदूगिरीचा वापर करत, घरात एक विशेष पूजा केल्यास त्यांच्या मुलाला निश्चितपणे नोकरी लागेल, असा दावा केला. भोळ्याभाबड्या पालकांनी त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे हा भोंदू बाबा पूजा करण्यासाठी आणि धार्मिक विधी उरकण्यासाठी थेट पीडितेच्या घरी पोहोचला.

हे ही वाचा : Maharashtra Weather : जुलैमध्ये पावसाची दांडी, राज्यात असं का घडतंय? हवामान विभागाची अपडेट

महिलेवर बळजबरी

मात्र, 27 जून रोजी पूजेचे नाटक सुरू असताना, नराधम बाबाने एक बनाव रचला. त्याने पूजेसाठी काही झाडांची मुळे आणण्याच्या बहाण्याने पीडित महिलेच्या पतीला आणि मुलाला घराबाहेर पाठवून दिले. घरात कोणीही नसल्याची संधी साधून आरोपीने महिलेवर बळजबरी करत अत्याचार केला. एवढेच नव्हे तर, या घटनेबाबत कोणालाही काही सांगितल्यास तुझ्या पतीची हत्या घडवून आणू, अशी थेट धमकीही त्याने पीडितेला दिली.

हे ही वाचा : 'पप्पा माझ्यावर बलत्कार करतात, दुसऱ्यांनाही...' मुलीनं पेटवून घेतलं, नेमकं प्रकरण काय?

'असं' बाहेर आलं प्रकरण

या भयानक धमकीमुळे घाबरलेली महिला अनेक दिवस गप्प राहिली आणि तिने हा धक्कादायक प्रकार कोणालाच सांगितला नाही. मात्र, 5 जुलै रोजी जेव्हा या नराधम बाबाने पुन्हा एकदा त्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पीडितेने धीर धरून घडलेला सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. यानंतर संतप्त दाम्पत्याने तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी संजय शिरोडेला बेड्या ठोकल्या असून, या भोंदू बाबाने नोकरीचे आणि पूजेचे आमिष दाखवून इतरही काही कुटुंबांना आपली शिकार बनवले आहे का, याचा तपास नागपूर पोलीस करत आहेत.