डिलिव्हरी बॉय महिलेच्या घरात घुसला, बाथरूममध्ये जाऊन केलं अश्लील कृत्य

मुंबई तक

• 07:06 PM • 12 Jul 2026

Crime News : एका डिलिव्हरी बॉयने महिलेशी कथितरित्या अश्लील कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, महिलांच्या सुरक्षिततेबाबत सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली जात आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

डिलिव्हरी बॉयचे महिलेच्या घरात शिरून अश्लील कृत्य 

point

महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित

Crime News : बंगळुरूमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका डिलिव्हरी बॉयने महिलेशी कथितरित्या अश्लील कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, महिलांच्या सुरक्षिततेबाबत सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली जात आहे. ही घटनेची बंगळुरूच्या मराठाहल्ली पोलीस ठाणे परिसरात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस तपासातून आरोपीची ओळख ही विजय मल्लिकार्जुन अशी ओळख समोर आली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 78 वर्षीय वृद्ध महिला गाढ झोपली, लेकानेच लाठीकाठीने मारहाण करत आईला संपवलं

डिलिव्हरी बॉयचे महिलेच्या घरात शिरून अश्लील कृत्य 

पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याच्या विरोधात भारतीय न्याय दंड संहिता कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर एका एक्स अकाउंटवर माहिती शेअर करण्यात आली. त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, एक डिलिव्हरी बॉय महिलेच्या घरात शिरून त्याने अश्लील कृत्य केलं. 

अशातच पोस्टमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. आरोपीविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली. हे प्रकरण सोशल मिडियावर आल्यानंतर बंगळुरू पोलिसांनी तात्काळपणे दखल घेतली. पोलिसांनी आपलं पथक पाठवून आरोपीचा शोध घेण्यास सांगितले. या प्रकरणी पोलीस उपायुक्तने संबंधित प्रकरणाची मराठाहल्ली पोलीस ठाण्यात एफआरआय दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू ठेवला.  

हे ही वाचा : बाप लेकीच्या नात्याला काळिमा! वडिलांचा मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडितेनं पेट्रोल टाकून घेतलं पेटवून

पोलिसांचं म्हणणं असं की, या प्रकरणाचा संपूर्ण तपास सुरू ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. आरोपी अटकेत आहे. या प्रकरणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.