जालना : बस थांबवली, मुलीला खाली उतरवलं, पुढे चालकाला मारहाण.. तरुणाने पुढे काय केलं?

मुंबई तक

13 Jul 2026 (अपडेटेड: 13 Jul 2026, 08:55 AM)

jalna private bus driver assaulted : जालना जिल्ह्यात एका तरुणाने भररस्त्यात खाजगी बस थांबवून चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. संपूर्ण प्रकार बसच्या सीसीटीव्ही आणि चालकाच्या मोबाईलमध्ये कैद झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

jalna private bus driver assaulted

jalna private bus driver assaulted

Google CTA

बातम्या हायलाइट

point

जालना : बस थांबवली, मुलीला खाली उतरवलं

point

पुढे चालकाला मारहाण.. तरुणाने पुढे काय केलं?

Jalna Crime News : जालना जिल्ह्यात एका खाजगी बस चालकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भररस्त्यात एका तरुणाने बस थांबवून त्यामधील एका ओळखीच्या युवतीला खाली उतरवले. हा प्रकार पाहून बस चालकाने त्या तरुणाला याबाबत कारण विचारला. मात्र, जाब विचारल्याचा राग मनात धरून संबंधित तरुणाने चालकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने चालकाला बुक्यांनी बेदम मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार बसमध्ये बसलेल्या प्रवाशांसमोर घडला. विशेष म्हणजे ही घटना बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तसेच चालकाच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत अडचणीत, सुनेचे गंभीर आरोप, गुन्हा दाखल

बसमध्ये चढला अन् ओळखीच्या एका युवतीला खाली उतरवले...

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बस जालनाहून शेंद्रा एमआयडीसी येथील एका कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जात होती. बस बदनापूर येथील एका पेट्रोल पंपाजवळ पोहोचली असताना एका तरुणाने हात दाखवून बस थांबवली. बस थांबताच तो थेट बसमध्ये चढला आणि त्याच्या ओळखीच्या एका युवतीला खाली उतरवले. हा प्रकार पाहून चालकाने त्या तरुणाला याबाबत विचारणा केली. मात्र, साधा प्रश्न विचारल्याने तो संतापला आणि त्याने चालकाला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच बसमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात 'या' जिल्ह्यांत पावसाची हजेरी लागणार, हवामान विभागाची अपडेट

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, तरुणावर अदखलपात्र गुन्हा दाखल 

या घटनेमुळे बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. चालकाला मारहाण होत असल्याचे पाहून काही प्रवाशांनी मध्ये पडून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित तरुणाने त्यांच्याशीही उर्मटपणे वर्तन केले. त्यामुळे काही काळ बसमधील वातावरण तणावपूर्ण झाले. या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तसेच चालकाने मोबाईलवर केलेल्या व्हिडिओमध्ये झाले असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मारहाणीनंतर बस चालकाने बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज आणि उपलब्ध इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.