नागपूरमध्ये नराधमाचा गायीवर लैंगिक अत्याचार, आरोपी विवाहित असल्याची माहिती

योगेश पांडे

13 Jul 2026 (अपडेटेड: 13 Jul 2026, 03:53 PM)

Nagpur crime : नागपूरमध्ये मन सुन्न करून टाकणारा प्रकार समोर आला आहे. खुल्या मैदानात चारा खात असलेल्या गायीवर एका पुरूषाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संबंधित प्रकरणात पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे, आरोपीची ओळख समोर आली आहे.

Nagpur crime

Nagpur crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

गाय चारा चरताना नराधमाचे अश्लील कृत्य 

point

तक्रार दाखल करत आरोपीला अटक

Nagpur Crime : नागपूरमध्ये मन सुन्न करून टाकणारा प्रकार समोर आला आहे. खुल्या मैदानात चारा खात असलेल्या गायीवर एका पुरूषाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संबंधित प्रकरणात पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख दीपक समुद्रे अशी आहे. या या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. आरोपीचा विवाह झाला असून त्याला अपत्य देखील असल्याची माहिती समोर आली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : प्रेम विवाहाला आईचा विरोध, जावयाने सासूची कुऱ्हाडीने केली हत्या

गाय चारा चरताना नराधमाचे अश्लील कृत्य 

घडलेल्या घटनेनुसार, ही घटना नागपूर येथील मानकापूर पोलीस ठाणे परिसरातील सीनियर इंस्पेक्टर हरेश कालासेकर यांनी आज तक वृत्त माध्यमाशी बोलताना माहिती दिली. मानकापूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या एका खुल्या मैदानात गाय चारा चरत होती. त्याचदरम्यान नराधमाने सर्व मर्यादा ओलांडून गायीसोबत अश्लील कृत्य केलं. 

तक्रार दाखल करत आरोपीला अटक

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला अटक केली. आरोपीचे कृत्य एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. नंतर तक्रार दाखल करत आरोपीला अटक केली. प्राण्यांवरील क्रूरतेच्या कलमांन्वये गुन्हा दाखल केला. संबंधित प्रकरणात एफआरआय दाखल करण्यात आली. 

हे ही वाचा : मुंबईत 9 वर्षीय मुलीवर वॉचमनचा अत्याचार, गोडाऊनमध्ये नेलं अन्..

महिलांप्रमाणेच आता प्राण्यांवर देखील अशा हैवानी कृत्याच्या घटना घडू लागलेल्या आहेत. अशातच प्राण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.