आईनं पोटच्या लेकीला पैशांसाठी वेश्याव्यवसायात ढकललं, 40 हजार रूपयांच्या कमाईचे दिले वचन

मुंबई तक

14 Jul 2026 (अपडेटेड: 14 Jul 2026, 02:24 PM)

Crime News : आरोपींनी पीडितेला वेश्याव्यवसायात ढकलल्याचा पीडितेचा आरोप आहे. आरोपींने पीडितेला महिन्याला 40 हजार रूपयांची कमाई होईल असे आश्वासन दिले होते. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गु्न्हा दाखल केला. तसेच 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा देखील सुनावली. 

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

आईने लेकीला पैशांसाठी वेश्याव्यवसायात ढकलले

point

पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल 

Crime News : हिमाचल प्रदेशातील कल्लू येथे आईसह तीन आरोपींनी पीडितेला वेश्याव्यवसायात ढकलल्याचा पीडितेचा आरोप आहे. आरोपींने पीडितेला महिन्याला 40 हजार रूपयांची कमाई होईल असे आश्वासन दिले होते. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गु्न्हा दाखल केला. तसेच 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा देखील सुनावली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बायकोनं गरीब नवऱ्याच्या डोक्यात मोबाईल घातला, कोच पडून भळाभळा रक्त, अखेर दुर्दैवी अंत

आईने लेकीला पैशांसाठी वेश्याव्यवसायात ढकलले

पीडितेनं आरोप केला की, आईने तिला पैशांसाठी वेश्याव्यवसायात ढकलले. आरोपी सिकंदरने तिला 40 हजार प्रतिमाह पैसे मिळण्याचे वचन देखील दिले होते. तर आईसह सिकंदर, शिवशंकर आणि नितीन जैन यांचा देखील समावेश होता. यापैकी शिवशंकर आणि नितीन हे वेश्याव्यवसाय चालवायचे काम करायचे. 

पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल 

या प्रकरणातील मुख्य आरोपी हे शिवशंकर आणि नितीनच आहेत. पीडितेच्या आईसह तिघांवर भारतीय दंड संहिता कलम 370,376, 370 अ, 506 आणि ब पॉक्सो कायद्यांतर्गत कलम 4 तसेच 17 अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायद्याच्या कलम 3,4, आणि 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

शिवशंकराला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच आई, नितीन जैनवर मानवी तस्करी, गुन्हेगारीचा कट आणि पॉक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवून कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. 

हे ही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार, 12 राशींपैकी आठ राशींचे नशीब फळफळणार, तर दक्षता..

दरम्यान, जिल्हा वकील कुलभूण गौतम यांनी दिलेल्य़ा माहितीनुसार, 29 एप्रिल 2018 रोजी मनालीच्या कॉन्सुलर चाइल्ड हेल्पलाइनच्या एका पथकाने पीडितेला मनाली पोलीस ठाण्यात आणून तक्रार दाखल केली. संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, मुलीला आणि इतर तरुणींना जीवे मारण्याची धमकी देऊन वेश्याव्यवसायात ढकण्यात आले होते.