बायकोनं गरीब नवऱ्याच्या डोक्यात मोबाईल घातला, कोच पडून भळाभळा रक्त, अखेर दुर्दैवी अंत

मुंबई तक

• 01:07 PM • 14 Jul 2026

Crime News : कौटुंबीक वादातून पत्नीने आपल्या पतीवर मोबाईल भिरकवला, ज्यात पतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. संबंधित प्रकरणात महिलेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संबंधित तक्रारीत नमूद करण्यात आलं की, नवऱ्याला मृत्यूपूर्वी आपल्या मुलीला भेटू दिलं नाही. 

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

वादातून बायकोने नवऱ्याच्या डोक्यात मोबाईल घालून संपवलं

point

मुलीला भेटण्यास दिला नकार 

Crime News : ओडिशातील बलांगीर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कौटुंबीक वादातून पत्नीने आपल्या पतीवर मोबाईल भिरकवला, ज्यात पतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. संबंधित प्रकरणात महिलेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत नमूद करण्यात आलं की, नवऱ्याला मृत्यूपूर्वी आपल्या मुलीला भेटू दिलं नाही. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार, 12 राशींपैकी आठ राशींचे नशीब फळफळणार, तर दक्षता..

संबंधित प्रकरण हे ओडिशातील बलांगीर जिल्ह्यातील लक्ष्मीजोर ठाणे क्षेत्रातील चिमिनी भाटीपाडा गावातील आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, स्वप्नेश्वर मिश्राला 9 जुलै रोजी पोट दुखू लागलं होतं. तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान, डॉक्टरांनी नवऱ्याला मृत घोषित केले होते. 

वादातून बायकोने नवऱ्याच्या डोक्यात मोबाईल घालून संपवलं

मृत व्यकीचे वडील प्रफुल्ल कुमार मिश्रा यांनी लक्ष्मीजोर पोलीस ठाण्यात आपली सून अनामिका सत्पथीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत तक्रार दाखल केली. 21 जून रोजी पती-पत्नीच्या नातेसंबंधावरून झालेल्या वादातून अनामिकाने स्वप्नेश्वरवर मोबाईल फेकून मारला. या हल्ल्यात नवऱ्याच्या डोक्याला गंभीर इजा देखील झाली, नंतर जखमी झालेल्या ठिकाणी टाके घातले. 

मुलीला भेटण्यास दिला नकार 

संबंधित प्रकरणात वडिलांचा असा आरोप आहे की, सुनेच्या माहेरच्या कुटुंबीयांनी मुलीला सोबत नेले होते. ते सांगतात की, स्वप्नेश्वर रुग्णालयात उपचार घेताना, त्यांनी मुलीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र त्याला शेवटपर्यंत तिला भेटू दिलं नाही. 

हे ही वाचा : जळगाव : 7 जुलैला लग्न, 13 जुलैला मृत्यू; पोलीस पत्नीसोबत काय घडलं?

पोलीस तपासातून असे उघडकीस आले की, स्वप्नेश्वर बऱ्याच काळापासून तपास सुरू करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी भीमा भोई वैद्यकीय महाविद्यालयात आणि रूग्णालयात पाठवण्यात आला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर मृत्यूचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तपासातून पुढील प्रकरणाची कारवाई केली जाईल.