चिप्स अन् कोल्ड्रिंकचे आमिष, 7 वर्षीय चिमुरडीवर सामूहिक बलात्कार, बांधकामाधीन मॉलमध्ये काय घडलं?

मुंबई तक

• 07:33 AM • 14 Jul 2026

बांधकाम सुरु असलेल्या एका मॉलमध्ये 7 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये घडलेली ही घटना काय आहे, जाणून घ्या.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

चिप्स अन् कोल्ड्रिंकचे आमिष

point

7 वर्षीय चिमुरडीवर सामूहिक बलात्कार

point

बांधकामाधीन मॉलमध्ये काय घडलं?

Crime News : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील राजनगर एक्सटेंशन परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका बांधकाम सुरु असलेल्या मॉलमध्ये मजुरी करणाऱ्या दाम्पत्याच्या 7 वर्षांच्या निष्पाप मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. शुक्रवारच्या (10 जुलै) संध्याकाळी सुमारे साडेसात वाजेच्या सुमारास ही मुलगी नेहमीप्रमाणे आवारात खेळत असताना अचानक गायब झाली होती. काम संपवून पालकांनी तिचा शोध सुरू केला, मात्र ती कुठेच सापडली नाही. अखेर रात्री 1 च्या सुमारास मॉलच्या दुसऱ्या बेसमेंटमध्ये या चिमुरडीचा रक्ताळलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

चिप्स अन् कोल्ड्रिंकचं अमिष

या घटनेची माहिती मिळताच नंदग्राम पोलीस ठाण्याचे पथक, वरिष्ठ अधिकारी, फॉरेन्सिक सायन्स लॅब (FSL) आणि डॉग स्क्वाडसह घटनास्थळी दाखल झाले. मुलीच्या कुटुंबीयांनी अत्यंत गंभीर आरोप करत म्हटले आहे कि, नराधमांनी त्यांच्या मुलीला कुरकुरे, चिप्स आणि कोल्ड ड्रिंकचे आमिष दाखवून मॉलच्या आत नेले. तिथे तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करून शव बेसमेंटमध्ये फेकून देण्यात आला. कुटुंबीयांनी जेव्हा तिचा मृतदेह पाहिला, तेव्हा ती पूर्णपणे रक्ताने माखलेली होती आणि तिच्या डोक्यावर गंभीर दुखापतीच्या खुणा होत्या. या क्रूर कृत्याविरोधात पीडित कुटुंबाने आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा : 'पूजा करा, तुमच्या मुलाला नोकरी लागेल...' नागपुरातील भोंदू बाबाचा महिलेवर बलात्कार

एक वयस्क, तर दुसरा अल्पवयीन

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास चक्रावून मॉल आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन संशयितांची ओळख पटवली. याप्रकरणी पोलिसांनी एका वयस्क आरोपीला अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या दोन्ही आरोपींविरुद्ध हत्या, बलात्कार आणि पोक्सो कायदा (POCSO Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

हे ही वाचा : बाईक चोरीचा संशय, तरुणाला विजेचा शॉक; Video व्हायरल

मजूरांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

पोलिसांनी सांगितले की, पीडित कुटुंबाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. सध्या या प्रकरणाची सर्वात महत्त्वाची कडी शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) अहवाल असून, त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. दरम्यान, या घटनेमुळे शेकडो मजूर कुटुंब राहत असलेल्या    बांधकामाधीन वास्तूंच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मॉलच्या बेसमेंटसारख्या सुनसान भागात कोणालाही सहज प्रवेश कसा मिळाला आणि या निष्पाप मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.