पालघरमध्ये खाकी वर्दीला बट्टा, 56 वर्षीय पोलिसाचा 13 वर्षीय मुलीवर विनयभंग

मुंबई तक

14 Jul 2026 (अपडेटेड: 14 Jul 2026, 06:06 PM)

Palghar crime : पालघर जिल्ह्यात पोलीस दलाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. रक्षक मानल्या जाणारे पोलीस भक्षक ठरलेत. पालघरमध्ये पोलीस दलात कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपीवर सातपाटी पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

Palghar crime

Palghar crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आरोपीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप 

point

आरोपी पोलिसाला अटक 

point

पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल 

Palghar Crime : मोहम्मद हुसेन खान - पालघर जिल्ह्यात पोलीस दलाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. रक्षक मानल्या जाणारे पोलीस भक्षक ठरलेत. पालघरमध्ये पोलीस दलात कार्यरत असलेल्या संजय प्रभाकर काशीद (वय 56) यांच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपीवर सातपाटी पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनं पालघर पोलीस दलावर काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : जालना: मुलगा अंध जन्मल्याचा राग, नवऱ्यासह सासूने दोघांना विहिरीत फेकलं

आरोपीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप 

सातपाटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांच्या माहितीनुसार, आरोपी पोलीस शिपाई आणि पीडित मुलीची पूर्वीपासून ओळख होती. 8 जुलै रोजी पीडित मुलगी उसने पैसे घेण्यासाठी आरोपीच्या घरी गेली असता, आरोपीने तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. घडलेला सर्व प्रकार मुलीने आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी सातपाटी पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार दाखल केली. 

आरोपी पोलिसाला अटक 

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी कोणतीही दिरंगाई केली नाही. आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. 

हे ही वाचा : आईनं पोटच्या लेकीला पैशांसाठी वेश्याव्यवसायात ढकललं, 40 हजार रूपयांच्या कमाईचे दिले वचन

पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल 

अशातच प्रकरणाचा पुढील तपास हा सातपाटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे करीत आहेत. पोलीस दलातील कर्मचाऱ्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्ह्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनं संपूर्ण पोलीस दलाच्या कामगाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशातच पोलीस दल हादरून गेल्याचे वृत्त आहे.