17 वर्षीय मुलीने प्रियकरासाठी आईलाच संपवले, बेडरुममध्ये पुरला मृतदेह; वर्षभरानंतर 'असं' बाहेर आलं प्रकरण

मुंबई तक

• 04:28 PM • 26 Mar 2026

Crime News : गेल्या एका वर्षापासून बेपत्ता असलेल्या 40 महिलेचा सांगाडा चक्क तिच्याच बेडरूममध्ये जमिनीखाली सापडला. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेची 17 वर्षीय मुलगी आणि तिचा 22 वर्षीय प्रियकर यांना ताब्यात घेतले आहे. हत्येचा हा कट रचून  पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घरातच गाडून त्यावर सिमेंटचे पक्के बांधकाम केले होते.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

17 वर्षीय मुलीने प्रियकरासाठी आईलाच संपवले

point

बेडरुममध्ये पुरला मृतदेह

point

वर्षभरानंतर 'असं' बाहेर आलं प्रकरण

Crime News : गेल्या एका वर्षापासून बेपत्ता असलेल्या 40 महिलेचा सांगाडा चक्क तिच्याच बेडरूममध्ये जमिनीखाली सापडला. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेची 17 वर्षीय मुलगी आणि तिचा 22 वर्षीय प्रियकर यांना ताब्यात घेतले आहे. हत्येचा हा कट रचून  पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घरातच गाडून त्यावर सिमेंटचे पक्के बांधकाम केले होते. तेलंगणमधील हैदराबाद येथील जवाहरनगर भागात ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

हे वाचलं का?

आई बेपत्ता झाल्याची तक्रार

घटनेची पार्श्वभूमी अशी की, अंजू दासारी या घरकाम करून आपल्या दोन मुलींसह राहत होत्या. 17 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांची मोठी मुलगी रोशनी कुमारी हिने आई बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. आई कामावर गेल्यावर परतलीच नाही, असे तिने तक्रारीत म्हटले होते. सुरुवातीला पोलिसांनी हा बेपत्ता झाल्याचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला, मात्र अनेक महिने उलटूनही अंजू यांचा कोणताही थांगपत्ता लागत नव्हता.

हे ही वाचा : रात्री झोपण्यापूर्वी पती-पत्नीचा वाद, नवऱ्याने बायकोच्या डोक्यात इस्त्री घालून डोकेच फोडले, 'या' कारणामुळे केली हत्या

प्रेमातला अडसर दूर करण्यासाठी भयानक कट

तपासादरम्यान पोलिसांना अंजू यांच्या धाकट्या मुलीच्या वागण्यावर आणि जबाबावर संशय आला. तिने प्रत्येक वेळी चौकशीत वेगवेगळी माहिती दिल्याने पोलिसांचे संशयाचे सुई तिच्याकडे वळली. पोलिसांनी जेव्हा तिचे कॉल डिटेल्स तपासले, तेव्हा ऑटो चालक माँटी कुमार सिंह याच्याशी तिचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. या दोघांच्या लग्नाला अंजू दासारी यांचा कडाडून विरोध होता, हाच विरोधाचा राग मनात धरून मुलीने प्रियकराच्या मदतीने आईचा काटा काढण्याचे ठरवले.

हे ही वाचा : एक फ्लॅट, दोन पुरुष आणि फ्लॅटमध्ये मोलकरणीची रक्ताच्या थारोळ्यातील बॉडी, ठाण्यातील उच्चभ्रू सोसायटीत काय घडलं?

बेडरुममध्येच खड्डा खणून पुरला मृतदेह

17 मार्च रोजी पोलिसांनी माँटी आणि अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी सांगितले की, हत्येनंतर दुर्गंधी येऊ नये आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी बेडरूममध्येच खड्डा खणून मृतदेह पुरला आणि वरून पक्के काँक्रीट केले. बुधवारी फॉरेन्सिक टीमच्या उपस्थितीत पोलिसांनी बेडरूम खोदून मृतदेहाचे अवशेष बाहेर काढले. सध्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास करत आहेत.