Crime News : काही दिवसांपूर्वी एका महिला पोलिस कॉन्स्टेबलने तिच्या सहकारी पुरुष कॉन्स्टेबल चंद्रकांतवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचे आरोप केले होते. पीडितेच्या म्हणण्यानुसार, चंद्रकांत तिला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत होता. 21 मार्च रोजी मोबाईल परत करण्याच्या बहाण्याने तिला बोलावून घेतले आणि कारमध्ये ओढून बलात्काराचा प्रयत्न केला. यानंतर तिने आरडाओरडा केल्यावर आरोपी तिच्या स्कूटीची चावी घेऊन पळून गेला. मात्र पोलिस तपासात काहीतरी वेगळीच माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ परिसरातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
खात्यात 40 ते 50 हजार ट्रान्सफर
मेरठ पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास केला असता कथेत एक वेगळेच वळण मिळाले आहे. एसपी सिटी आयुष विक्रम यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मार्च रोजी ज्या दिवशी ही घटना घडली, त्याच दिवशी महिला शिपायाच्या खात्यातून आरोपीच्या खात्यात 40 ते 50 हजार रुपये ट्रान्सफर झाले आहेत. इतकेच नाही तर, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला पोलीस शिपाई स्वतःहून आरोपीसोबत बसून जाताना दिसत आहे. यामुळे सुरुवातीला करण्यात आलेला अपहरणाचा दावा पोलिसांना संशयास्पद वाटत असून, या दोघांमध्ये पैशांवरून जुना वाद असल्याचे समोर येत आहे.
चंद्रकांतला नोटीस
पोलिसांनी आरोपी हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत याला त्याची बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे. पोलीस आता या प्रकरणाची तांत्रिक आणि कागदोपत्री पडताळणी करत असून, हा खरोखरच लैंगिक छळाचा प्रकार आहे की आर्थिक वादातून करण्यात आलेली तक्रार, याचा शोध घेत आहेत. दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांशी संबंधित हे प्रकरण असल्याने विभागात याची मोठी चर्चा सुरू आहे.
हे ही वाचा : शक्तीवर्धक औषधांच्या अतिसेवणामुळे अशोक खरातला आला होता अर्धांगवायूचा झटका; अजूनही पुर्णपणे रिकव्हर नाही
महिलेच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह
या प्रकरणाचा पुढील तपास पूर्ण झाल्यावरच सत्य समोर येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तूर्तास, सीसीटीव्ही फुटेज आणि बँक ट्रान्झॅक्शनचे पुरावे महिलेच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. हेड कॉन्स्टेबलने अद्याप पोलिसांसमोर हजर होऊन आपला जबाब नोंदवलेला नाही. या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे.
ADVERTISEMENT











