श्रवण दास महाराजाचा कारनामा! लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Bihar Crime News : बिहारच्या मिथिलांचलमध्ये धर्म आणि आस्थेच्या आड लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. येथील एका सुप्रसिद्ध कथा वाचकाने अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले. इतकेच नाही तर ती मुलगी गर्भवती झाल्यानंतर तिचा गर्भपातही केला.

Bihar Crime News

Bihar Crime News

मुंबई तक

19 Jan 2026 (अपडेटेड: 19 Jan 2026, 03:10 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सुप्रसिद्ध कथावाचक बाबाचा कारनामा

point

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

point

गर्भपातानंतरही थांबला नाही

Bihar Crime News : बिहारच्या मिथिलांचलमध्ये धर्म आणि आस्थेच्या आड लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. येथील एका सुप्रसिद्ध कथा वाचकाने अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले. इतकेच नाही तर ती मुलगी गर्भवती झाल्यानंतर तिचा गर्भपातही केला. मुलीने लग्नासाठी तगादा लावल्यानंतर कथावाचकाने एका बंद खोलीत लग्नही केले. मात्र हे लग्न सार्वजनिक करण्यास त्याने नकार दिल्यानंतर मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर या बाबाला अटक करण्यात आली आहे. श्रवण दास महाराज असं या कथावाचक बाबाचं नाव आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : समलैंगिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा काटा काढला, महिला प्रियकरासोबत कट रचला, 60 हजारांची सुपारी

लग्नाच्या अमिषाने शारिरीक संबंध

मिळालेल्या माहितीनुसार, श्रवण दासचं त्या मुलीच्या घरी येणं-जाणं होतं. या दरम्यान दोघांची ओळख झाली आणि ते एकमेकांच्या जवळ आले. यानंतर महाराजाने मुलीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासही सुरुवात केली. यातच ती मुलगी गर्भवती राहिली. मात्र गोड बोलून तिचा गर्भपात केला गेला. मुलीचं लग्नाचं वय झाल्यानंतर लग्न करण्याचं अमिष त्यानं तिला दाखवलं. मुलीने दबाव वाढवल्यानंतर एका बंद खोलीत त्याने तिच्याशी लग्न केलं. मात्र हे लग्न सार्वजनिक करण्यास त्याने नकार दिला. अनेकदा पंचायत होऊनही महाराजाने तिचा बायको म्हणून स्वीकार करण्यास नकार दिला.

लग्नाचा व्हिडिओ आला समोर

या प्रकरणी कथावाचक श्रवणदास आणि त्या अल्पवयीन मुलीचा एका खोलीत लग्न करत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत श्रवणदास त्या मुलीच्या कपाळावर सिंदूर लावताना स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यानंतर या प्रकरणाचं गांभीर्य वाढल्यानं पोलिसांनी तातडीची कारवाई केली आहे.

हे ही वाचा : डॉक्टर संग्राम पाटलांना लंडनला जाण्यापासून रोखलं, मुंबई विमानतळावर काय घडलं?

पोलिसांनी अटक करताच जोडले हात

याप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर दरभंगा पोलिसांनी बाबाला अटक केली आहे. त्यासाठी खास पोलिसांची एसआयटी स्थापन करण्यात आली. एका गुप्त माहितीच्या आधारे, कथाकार श्रवण दासला हाऊसिंग बोर्ड कॉलनीतून अटक केली. चौकशीनंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, पोलिस त्याला घेऊन जात असताना कॅमेऱ्यासमोर हात जोडत आपण निर्दोष असल्याचं बाबाने सांगितलं. श्रवण दासने आठव्या वर्षी घर सोडून मौनी बाबांसोबत राहण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने पीएचडीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या १० वर्षांपासून तो कथा वाचन करत आहे.
 

    follow whatsapp