Crime News : बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाने आपल्याच अल्पवयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 15 एप्रिल 2026 रोजी कोचिंग क्लास सुटल्यानंतर आरोपी शिक्षकाने या विद्यार्थिनीला अडवून तिच्यावर अत्याचार केला आणि या कृत्याचा अश्लील व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो सातत्याने तिचे लैंगिक शोषण करत राहिला.
ADVERTISEMENT
दोन शिक्षकांनी केला बलात्कार
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या अर्जानुसार, मुलगी दोन वर्षांपूर्वी संबंधित शिक्षकाकडे दहावीचे शिक्षण घेत होती. दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ती तिच्या वडिलांकडे पाटण्याला निघून गेली होती. मात्र, आरोपीने तिला पुन्हा अश्लील व्हिडिओची भीती दाखवून बोलावून घेतले. त्यानंतर एका दुसऱ्या शिक्षकाच्या मदतीने तिला अंमली पदार्थ पाजून पुन्हा तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि नवीन व्हिडिओ बनवून तिचे शोषण चालूच ठेवले. भीतीपोटी पीडिता अनेक दिवस गप्प राहिली होती.
हे ही वाचा : Shiv Sena सुनावणी: राजकीय पक्ष की विधिमंडळ पक्ष, सुप्रीम कोर्टात घमासान युक्तिवाद सुरू
पीडितेचे अश्लील फोटो
आरोपी शिक्षकाची अरेरावी एवढ्यावरच थांबली नाही, तर त्याने 17 जुलै रोजी पीडितेच्या वडिलांना आणि इतर काही लोकांना हे अश्लील फोटो पाठवले. फोटो समोर आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबाला हा धक्कादायक प्रकार समजला. स्वतःच्या मुलीवर झालेला हा अत्याचार आणि मिळालेली धमकी यानंतर कुटुंबाने आरोपींविरोधात न्यायासाठी पोलिसांचे दार ठोठावण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा : लग्न होत नाही म्हणून आईनं पोटच्या लेकीला संपवलं, धाकटी बहीण होती सामील
शिक्षकांवर गुन्हा दाखल, पुढे काय?
या संपूर्ण प्रकरणी पीडितेच्या आईने समस्तीपूर येथील महिला पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पोलीस ठाण्याने या तक्रारीची गंभीर दखल घेत संबंधित आरोपी शिक्षकांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील दोषी शिक्षकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन महिला पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आले आहे.
ADVERTISEMENT












